Download App

‘भाजपच्या सत्तेची चिमणीही लवकरच’… ‘त्या’ वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा फडणवीसांना खोचक टोला

Vijay Wadttiwar Replies Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले पण, महाविकास आघाडीचा पोपट मेलेला नाही. भाजपाच्या सत्तेची चिमणी भुर्रर्र उडून जाईल, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवताना एक विधान केले होते. ते म्हणाले, राजाचा आवडता पोपट जसा मेला तसे उद्धवजी यांना पोपट मेला असं कुणी सांगतच नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिल्लक सेना आहे अस फडणवीस म्हणाले होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या…तर शिक्षणाला काही अर्थ नाही

त्यांच्या या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले पण, महाविकास आघाडीचा पोपट मेलेला नाही. भाजपाच्या सत्तेची चिमणी भुर्रर्र उडून जाईल. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. जागा वाटपाबाबत सोनिया गांधी, राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे नेते निर्णय घेतील.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. कोणता पक्ष किती जागा लढविणार याला काही अर्थ नाही. राज्यात आता बदलाचे वारे वाहत असून भाजपाचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकपेक्षाही वाईट अवस्था महाराष्ट्रात भाजपची होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. संजय राऊत काय म्हणाले माहिती नाही किंवा त्यांनी म्हटलं म्हणून निर्णय झाला असे नाही. तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते बसून जागा वाटपाबाबत चर्चा होईल. महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ. महाविकास आघाडी होऊ नये यासाठी भाजप मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण, मीठ विरघळून जाईल असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

follow us