Download App

Rohit Pawar : ‘तिकीट’ संकटात म्हणून दिल्ली दौरे वाढले का? रोहित पवारांचा विखेंना खोचक सवाल

Rohit Pawar vs Sujay Vikhe : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या आदेशाची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकात हे नवे पक्षचिन्ह घेऊन शरद पवारांचा पक्ष लोकांत जाणार आहे. या निर्णयावर भाजप खासदार सुजय विखे यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या याच टिकेवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार पलटवार केला आहे. सुजय विखेंना (Sujay Vikhe) विचारा की नजीकच्या काळात तुमचे दिल्ली दौरे का वाढले आहेत असा सवाल रोहित पवार यांनी केला.

लोकसभेत महाराष्ट्राचा डंका! सुजय विखे पाटलांसह 5 नवोदित खासदार चमकले

रोहित पवार आज कालवा सल्लागार समितीची पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली. तुतारी वाजेल की नुसतीच हवा निघेल अशी टीका सुजय विखे यांनी केली होती यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर रोहित पवार म्हणाले, सुजय विखेंना विचारा की नजीकच्या काळात तुमचे दिल्ली दौरे का वाढले आहेत. त्यांचच तिकीट कापलं जाईल की काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अमित शहांना तुम्ही दहा-दहा वेळा भेटता त्यामुळे हवा कुणाची निघाली हे तुम्ही लोकांना एकदा सांगा. हवा काढणारे लोकं तुमच्याच पार्टीतले आहेत का हे देखील एकदा स्पष्ट करा असे आव्हान त्यांनी खासदार सुजय विखेंना दिले.

काय म्हणाले होते विखे ?

चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार म्हणाले लढाई पूर्वी तुतारी वाजवली जाते. आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवू. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, मशाली घ्या तुतारी घ्या स्वागत आहे तुमचं. तुतारी वाजेल की, नुसती हवा निघेल हे देखील कळेल. तसेच फार तर फार तुतारी आम्ही तुम्हाला नव्या घेऊन देऊ अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी विखे यांनी केली होती.

बच्चा है पर: दोन ओळींचे कॅप्शन अन् 54 सेकंदाचा व्हिडीओ, रोहित पवार अजितदादांना थेट भिडले!0

follow us

वेब स्टोरीज