“मी शब्द पाळला, ७२ तासांच्या सरकारमध्ये गेलो”; पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांनी काय सांगतिलं?

मला साहेबांनी आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. पण मी मात्र शब्द मोडता येणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं.

"मी शब्दाचा पक्का, त्यावेळीही शब्द पाळला"; अजितदादांनी फोडलं पहाटेच्या शपथविधीचं गुपित

"मी शब्दाचा पक्का, त्यावेळीही शब्द पाळला"; अजितदादांनी फोडलं पहाटेच्या शपथविधीचं गुपित

Ajit Pawar : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा अजूनही राजकारणात सुरू आहेत. आताही अजित पवार यांनी (Ajit Pawar) हाच मुद्दा उपस्थित करत आपण शब्दाला कसे पक्के आहोत हेच सांगितलं. शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी जुन्नर तालुक्यातील केंदूर येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधी मागील आणखी एक गुपित उघड केले.

अजित पवार म्हणाले, एका उद्योगपतीच्या घरी सहा बैठका झाल्या. तिथून मी मुंबईला परतल्यानंतर मला साहेबांनी (शरद पवार) आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. मी म्हणालो असं कसं आपण त्यांना शब्द दिलाय. सहा बैठकाही झाल्यात. मला शब्द मोडता नाही मोडता येणार असं मी ठामपणे सांगितलं होतं. मी त्यावेळी दिलेला शब्द पाळला. ७२ तासांसाठी का होईना पण सरकारमध्ये गेलो. ते सरकार पुढं चाललं नाही पण मी माझा शब्द पाळला होता.

Ajit Pawar आताच मिशा काढा, 4 जूननंतर तर, भाऊ श्रीनिवास पवारांचा खोचक सल्ला

शरद पवार आमचं दैवत आहेत. यात कुणाचच दुमत असण्याचं काही कारण नाही. पण कुठेतरी वेळ असते. ८० वर्षांनंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी. कुणी म्हणतं या वयात साहेबांना सोडायला नको होतं. खरंतर मी साहेबांना सोडणारच नव्हतो. एका वयानंतर दुसऱ्यांनाही संधी द्यायला हवी. आता मी सुद्धा वयाची ६० वर्षे पार केली आहेत. आम्ही आहोत ना. काही चुकलं तर आमचा कान धरा, असे अजित पवार पक्ष सोडण्याच्या मुद्द्यावर म्हणाले.

 

Exit mobile version