कर्नाटकातील मराठी उमेदवारांच्या पराभवाचा भाजपाचा डाव, राज्यातून पुरवला पैसा; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on Karnataka Elections : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी उमेदवारांचा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आम्ही जाणारच आहोत. शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असेल तर त्यांनी सीमाभागातील मराठी जनांशी बेईमानी करू नये. आमचे रक्त शुद्ध आहे म्हणून तर आम्ही काही झाले तरी या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जाणार आहोत, असे स्पष्ट करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा […]

Sanjay Raut : सिंचम घोटाळा फेम अजित पवारांना.. 'त्या' पत्रावरून राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut : सिंचम घोटाळा फेम अजित पवारांना.. 'त्या' पत्रावरून राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut on Karnataka Elections : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी उमेदवारांचा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आम्ही जाणारच आहोत. शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असेल तर त्यांनी सीमाभागातील मराठी जनांशी बेईमानी करू नये. आमचे रक्त शुद्ध आहे म्हणून तर आम्ही काही झाले तरी या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जाणार आहोत, असे स्पष्ट करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी भाजप नेते ठाण मांडून बसले आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातून पैसा गेला आहे, असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

Mahesh Tapase : शरद पवारांचा राजीनामा कमिटीने मंजुर केला तर आम्ही आमचा राजीनामा देऊ

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत पुढे म्हणाले, सीमा भागातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आम्ही तेथे जाणार आहोत. माझ्यावर तर बेळगाव पोलिसांचे वॉरंट आहे. त्यामुळे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मला पुढे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनीही बेळगावात जाऊन मराठी उमेदवारांचा प्रचार करावा, असे आवाहन राऊत यांनी केले.

शिंदेही कर्नाटकच्या मैदानात 

कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. सध्या येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारात भाजपसह एनडीएतील घटक पक्ष असलेल्या वरिष्ठ नेत्यांनाही उतरवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रचारासाठी जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिंदे आपल्या टीमसह कर्नाटकला जाण्याची शक्यता आहे. बेळगावसह अन्य सीमाभागातही ते प्रचार करतील अशी शक्यता आहे.

Sanjay Shirsat : पवारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार हेच योग्य

भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहेत. भाजपने सहा जणांची यादी तयार केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तब्बल 54 मोठ्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील, आ. राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे.

Exit mobile version