Download App

फडणवीसांबरोबर पुन्हा युती करणार का ? ; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले

Uddhav Thackeray : राज्यात युती तुटल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारात भाजपाच्या मदतीने सरकार आणले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही  संधी सोडत नसायचे. त्यानंतर आज मात्र हे दोन्ही नेते हसत गप्पा मारत विधानभवनात दाखल झाले. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना सुरुवात झाली. या चर्चांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

हे ही वाचा : वीस वर्षे झाली राज लालबुंदच : उद्धव आणि शिवसेनेवरचा राग जाईना 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकत्रच विधानभवनात दाखल झाले. विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यात दोन्ही विरोधी हसत गप्पा मारत एकत्र येत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन्ही नेते एकत्र येणार का, अशाही चर्चा सुरू झाल्या.

विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी त्यांना फडणवीसांच भेट योगायोग होता का, असा प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले आधी खुलेपणा होता. आता बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी होते असं म्हणतात. जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी बंद दाराआड चर्चा झाली तर बोलू.

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना हे युतीचे तर संकेत नाहीत ना, असा प्रश्न विचारला. त्यावर ठाकरे म्हणाले, आम्ही दोघे एकत्र प्रवेश करत असल्याने एकमेकांना अभिवादन केलं. कोणाला हाय हॅलो म्हणणंही आता पाप झालं आहे का ? हेतूपुरस्सरच अशा गोष्टी कराव्यात का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

आमच्या सरकारच्या काळात आम्ही मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेतला होता. मागील गुढीपाडव्याला भूमिपूजनही केले होते. पण त्यानंतर एक वीटदेखील रचली गेली नाही. पण आता तिथे काही कार्यालये आणि वास्तू उभी करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत आम्ही आमची मते व्यक्त केली आहेत.

Tags

follow us