Download App

‘काँग्रेस अन् आमच्यात फूट पाडण्याचा पटोलेंचा डाव, वरिष्ठांनी पकडल्यानंतर’.. ‘वंचित’चा दावा नेमका काय?

VBA replies Nana Patole : लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या इराद्याने वंचित बहुजन आघाडीने (VBA) उमेदवार जाहीर केले. यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीवर टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) थेट अकोल्यात येत खुली ऑफर दिली होती. प्रकाश आंबेडकरांसाठी मविआचे रस्ते बंद झालेले नाहीत. तुम्हाला किती जागा पाहिजेत ते सांगा. भाजपला पराभूत करण्यासाठी पुढे या, असे पटोले म्हणाले.

आता पटोले यांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आघाडीने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की काल अकोल्यात नाना पटोले जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला. नाना पटोले आम्हाला एक सांगा, जर तुम्हाला संविधान वाचवायचे होते तर तुम्ही आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकर यांना महाविकास आघाडीच्या बैठकीतून दीड तास बाहेर का बसवले?

काँग्रेस आणि आमच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे काम करताना वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा तुम्हाला पकडले तेव्हापासून काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात बैठकीत यायला लागले. या सर्व गोष्टींचा खुलासा तुम्ही अकोल्यात करावा, असे आव्हान वंचित आघाडीने दिले आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?

प्रकाशजी आणखी रस्ते बंद झाले नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे ते सांगा. पण भाजपला पराभूत करण्यासाठी सोबत या, अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे, असं पटोले म्हणाले. तुम्ही म्हणता पटोले यांना अधिकार नाहीत. मी स्वतःच्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेनं. मी भाजप सोडल्यापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करणं सुरू केलं. मुंबईतील संविधान बचाव रॅलीत प्रकाश आंबेडकरांनी माझा अपमान केला. माझ्यावर खोटे आरोप केले. तरीही माझी आंबेडकरांना सोबत येण्याची ऑफर असल्याचं पटोले म्हणाले

follow us

वेब स्टोरीज