Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच लोकसभेत भाजपसह (BJP) महायुतीला धक्का देणाऱ्या महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि शिवसेनाने (ठाकरे गट) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 16 ऑगस्ट रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
आज विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे 20 ऑगस्ट रोजी मुंबईत काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येणार आहे. माहितीनुसार, या दिवशी महाविकास आघाडीची निवडणुकीच्या संदर्भात एक महत्वाची बैठक होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.
या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे देखील उपस्थित रहाणार आहे तसेच या बैठकीमध्ये जागावाटपाबाबत आणि मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
IND vs SL: गंभीर – रोहितला धक्का, 27 वर्षांनंतर श्रीलंकेने जिंकली मालिका
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी याबाबत माहिती देत सांगतिले की, 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती आहे. त्याच दिवशी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहे.