Download App

ऑपरेशन चुकलं, पेशंट मात्र वाचला; निकालावरून बच्चू कडूंची कोपरखळी

Bacchu Kadu On Supreme Court Decision: राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharastra Political Crisis) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis government)या निर्णयाचं जोरदारणे स्वागत करण्यात आले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले आहे. हे सर्व घडत असतानाच या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. त्यातच या निर्णयावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे.

आगामी निवडणुकांसाठी नितीश कुमारांनी सांगितला फॉर्म्युला

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा मिळाला आहे. एकतर निलंबण झालं नाही आणि निलंबणाचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनाच द्यावा लागेल. आणि विधानसभेच्या अध्यक्षांनीच हे सरकार बनवलं आहे, त्यामुळे अध्यक्षांकडे वेगळा निर्णय लागेल असं मला काही वाटत नाही, अशी खोचक टीपणी यावेळी बच्चू कडूंनी केली आहे.

एकंदरीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मेहनत आणि जुळवलेली कागदपत्रं त्याचबरोबर असलेली संख्या याच्यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असा विचार केला तर आमदारांची संख्या शिंदेंकडे जास्त आहे. जिल्हाप्रमुखांची संख्या जास्त आहे. खासदारांची संख्या जास्त आहे.

हा जो निर्णय झालेला आहे तो संख्येच्या बळावर झालेला आहे. त्यामुळे निश्चितच यापुढे शिंदे-फडणवीस सरकार मजबुतीने काम करेल, त्याचवेळी बच्चू कडू म्हणाले की, इथं पेशंट वाचलेलं आहे. ऑपरेशनमध्ये चूका झाल्या असतील त्या चूका जाऊद्या पण पेशंट वाचला हे महत्वाचं आहे, असा टोलाही यावेळी माजी मंत्री बच्चू कडू यांनी लगावला आहे.

Tags

follow us