महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी दंगली, मात्र सभा होणारच…

मुंबई : रामनवमीच्या दिवशी राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrpati Sambhajinagar) दंगल (Riots) झाली. यावेळी पोलिसांची वाहने देखील जाळण्यात आली. आता यावरूनच राज्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. दरम्यान यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. संभाजीनगरमध्ये आमची सभा होणार आहे. मात्र कायदा – सुव्यवस्थेचे कारण देत आमची सभा […]

Untitled Design   2023 03 31T153415.840

Untitled Design 2023 03 31T153415.840

मुंबई : रामनवमीच्या दिवशी राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrpati Sambhajinagar) दंगल (Riots) झाली. यावेळी पोलिसांची वाहने देखील जाळण्यात आली. आता यावरूनच राज्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. दरम्यान यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. संभाजीनगरमध्ये आमची सभा होणार आहे. मात्र कायदा – सुव्यवस्थेचे कारण देत आमची सभा होऊ द्यायची नाही असे षडयंत्र काही जणांनी केले असल्याची टीका राऊत यांनी यावेळी बोलताना केली. मात्र सभा होणारच हे देखील राऊत बोलले आहे.

यावर अधिक बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रामनवमी निमित्त दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी हे हे यशस्वी देखील झाले. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी सामंजस्याने हा उत्सव उत्साहात साजरा केला.

दरम्यान 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा आहे. ही सभा होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. संबंधित भागात तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे कारण देत तसेच कायदा – सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला परवानगी मिळू नये सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले आहे. अशी परखड वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

IPL 2023 : बॉलिंग करणाऱ्या संघाची होणार दमछाक, 90 मिनीटात टाकावे लागणार 120 बॉल

यापूर्वी कधीही रामनवमीच्या यात्रेदिवशी असे हल्ले झाले नाही. याआधी गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यात शोभायात्रा काढण्यात आल्या मात्र त्यावेळी असा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र ठाकरे गटाच्या खेड, मालेगाव या ठिकाणी सभा पार पडल्या. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला नाही हे पाहून काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली.

काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टपणे सांगितले

म्हणून काही लोक हाताशी धरून असं काही तरी करून वातावरण बिघडवायचं. तसेच जातीय धार्मिक तेढ निर्माण करायचे म्हणूनच कोर्टाने सरकारला नपुंसक म्हंटले आहे. हा त्यांचा नपुसंकतेचा पुरावाच आहे. दंगली घडविणे व दंगली घडविणाऱ्या लोकांवर कारवाई न करणे हे सरकार करत असल्याने कोर्टाने त्यांना झापले असल्याची टीका यावेळी संजय राऊत यांनी केली आहे.

Exit mobile version