IPL 2023 : बॉलिंग करणाऱ्या संघाची होणार दमछाक, 90 मिनीटात टाकावे लागणार 120 बॉल

IPL 2023 : बॉलिंग करणाऱ्या संघाची होणार दमछाक, 90 मिनीटात टाकावे लागणार 120 बॉल

IPL 2023 New Rule :  आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या सीजनमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. त्यातील एका नियमामुळे बॉलर्सची चांगलीच दमछाक होणार आहे.

यावेळी आयपीएलमध्ये 5 नवीन नियम बनवण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये स्लो ओव्हर रेटचा नियम देखील लागू करण्यात आलेला आहे. निर्धारित वेळेत जर कोणत्या संघाने आपल्या ओव्हर न पूर्ण टाकल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते.

PHOTOS : पंतप्रधान मोदींची नव्या संसदेला भेट; कशी असणार रचना

आयपीएल सामन्याच्या वेळी बॉलिंग करणाऱ्या टीमला 90 मिनीटांमध्ये 20 ओव्हर अर्थात 120 बॉल्स टाकावे लागणार आहेत. जर बॉलिंग करणाऱ्या संघाने वेळेत आपल्या ओव्हर्स पूर्ण नाही केल्यास त्यांना दंड होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याप्रमाणे 90 मिनीट संपल्यानंतर जेवढ्या ओव्हर टाकल्या जातील तेव्हा बाँड्रीवर फक्त 4 खेळाडू उपस्थित राहतील. इतर वेळी 5 खेळाडू बाँड्रीवर ठेवण्यात येतात. हा निर्णय फिल्डींग करणाऱ्या टीमसाठी अडचणीचा ठरु शकतो. त्यामुळे बॉलिंग करणाऱ्या टीमला आपल्या सर्व ओव्हर्स या वेळेतच पू्र्ण कराव्या लागतील.

IPL 2023 : सलामीचा सामना गमावलेल्या संघाने जिंकलंय दोनदा जेतेपद; काय सांगतात आकडे

दरम्यान, आज आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या मैदानावर पहिला सामना 2010 साली खेळवला गेला होता. या मैदानाचे नाव बदलल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2 आयपीएल सामने खेळवले गेले आहेत. एकुण या मैदानावर आत्तापर्यंत 7 सामने खेळवले गेले आहेत. या मैदानावर  पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमने फक्त 2 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या इनिगंमध्ये बॅटींग करणाऱ्या टीमने 5 सामने जिंकले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube