देशातील नवीन संसद भवनाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी अचानक नवीन संसद भवनाला भेट दिली.
यावेळी त्यांनी तासाभराहून अधिक वेळ नव्या संसदेमध्ये घालवला. या दरम्यान पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक कामाचा तपशीलवार आढावा घेतला.
कामाची पाहणी करताना त्यांनी निर्माणच काम करत असलेल्या कामगारांशी देखील संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते.
नव्या संसद भवनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात पायाभरणी केली होती.
केंद्र सरकारने 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये नवी दिल्लीतील संसदेच्या नवीन इमारतीचसह काही अन्य बांधकामाचा समावेश आहे.
संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी १२०० हून अधिक खासदार बसण्याची सोय आहे. यामध्ये लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत ३८४ खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार हे काम टाटा प्रोजेक्ट्सला 2020 मध्ये 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले होते. ज्याची किंमत नंतर वाढवून सुमारे 1,200 कोटी रुपये करण्यात आली.