काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टपणे सांगितले
पुणेः काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या भाषणांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणत होते. त्यावरून काँग्रेसबरोबर असलेले उद्धव ठाकरे हे नाराज झाले होते. ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावले होते. आता मात्र या मुद्द्यावरून काँग्रेसने पूर्णपणे माघार घेतली आहे. काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला आहे. विरोधकांची एकमत झाले असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारचा झटका, कर्मचाऱ्यांच्या खिशाला फटका; संपकऱ्यांचा पगार कापणार
पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरून काँग्रेसबरोबर असलेले पक्ष नाराज होते. चव्हाण यांनी एका प्रश्न उत्तर देताना सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधकांमध्ये चर्चा होऊन एकमत झाले असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना काय यात्रा काढायची आहे ती काढून द्या. शेवटी देशातील जनता ठरवेल, असे चव्हाण म्हणाले आहेत.
छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, संभाजीराजेंच्या पत्नी पुजाऱ्यावर भडकल्या
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व इतर भाषणांमध्ये स्वांतत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हटले होते. सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र माझ्याकडे असल्याचे गांधींना दाखविले होते. त्यावरून उद्धव ठाकरे नाराज झाले होते. मालेगाव येथील जाहीर सभेमध्ये ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सुनावले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांची बैठक झाली होती. त्यात या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर सावरकरांबाबत काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.