उद्धव ठाकरे हृदयात, फिक्स मुख्यमंत्री करु, मुस्लिम शिवसैनिकाने रक्तानं लिहीले पत्र

Muslim Shiv Sainik on Uddhav Thackeray : आज बीकेसीच्या (BKC) मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होत आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि आजची बीकेसीतील तिसरी सभा होत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही सभा होत आहे. या सभेला संगमनेरहून ठाकरे गटाचा एक मुस्लिम शिवसैनिक (Muslim Shiv Sainik) आला होता. त्याने रक्ताने लिहीलेलं पोस्टर तयार केलं […]

Untitled Design (6)

Untitled Design (6)

Muslim Shiv Sainik on Uddhav Thackeray : आज बीकेसीच्या (BKC) मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होत आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि आजची बीकेसीतील तिसरी सभा होत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही सभा होत आहे. या सभेला संगमनेरहून ठाकरे गटाचा एक मुस्लिम शिवसैनिक (Muslim Shiv Sainik) आला होता. त्याने रक्ताने लिहीलेलं पोस्टर तयार केलं होतं. त्यावर जिंकेपर्यंत लढू, 2024 ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फिक्स मुख्यमंत्री, कट्टर समर्थक मुस्लिम मावळा आजीज असे लिहीले आहे.

अशाप्रकारचे पोस्टर तयार करण्याचे कारण सांगताना तो म्हणाली की, उद्धव ठाकरे हे ह्रदयात बसलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांचे आम्ही निष्ठावंत आणि कट्टर समर्थक आहेत. त्याचे मुख्यमंत्री होणं हे महाराष्ट्राला गरजेचं आहे, असे तो म्हणाला. पुढं म्हणाला की प्रत्येकजण मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. आम्ही उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यामुळे मी हे पत्र लिहीले आहे. 2024 ला मुख्यमंत्री करुन दाखवू, असे त्यांनी सांगितले.

मुंबईवर राग असलेली लोकं दिल्लीत; आव्हाडांचा केंद्रावर घणाघात

भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका सुरु केला आहे. तिन्ही पक्षांकडून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वज्रमूठ सभेची मोठी तयारी केली जात होती. सभेच्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत. सभा स्थळी प्रत्येक खुर्चीवर पाण्याची एक बाटली ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय सभास्थळी सहा रुग्णवाहिकादेखील आहेत.

Exit mobile version