Maharashtra CM Name Final Eknath Shinde Resignation : विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालंय. 288 मतदारसंघांतील तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे, आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. परंतु महायुतीमध्ये मात्र राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार, याबाबत मोठं रणकंदन पाहायला मिळतंय.
दरम्यान काल दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत महायुतीच्या नेत्यांची बैठक देखील पार पडली. आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार आहे, असा निर्णय दिल्लीत झालाय. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची माहिती मिळतेय. तर दुसरीकडे अजित पवार हे सुरक्षेविनाच देवगिरी बंगल्यातून बाहेर पडते. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे.
एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता कायम
महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे मुख्यमंत्रिपदासाठी आपापल्या नेत्यांच्या नावाचा जप करत आहे. तर एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री, असा दावा शिंदेसेनेकडून केला जातोय. तर भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भावे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकावले आहेत. दरम्यान आता दिल्लीतून भाजपचे वरिष्ठ नेते कोणाचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी फायनल करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Maharashtra CM: विद्यमान विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस; राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का?
राज्याला नवा मुख्यमंत्री कोण मिळेल, देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार का? हे चित्र देखील लवकरच स्पष्ट होईल. आता दुसरीकडे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा करत आहेत. मात्र, दिल्लीतून मुख्यमंत्रीपदाच्या नावावर मोहर लागलेली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाले असल्याची माहिती समोर आलीय. काल सायंकाळनंतर शिंदे यांनी सर्व भेटीगाठी देखील रद्द केल्या आहेत.
भाजपकडे मुख्यमंत्रिपद गेल्यास एकनाथ शिंदे काही इतर निर्णय घेणार का? शिंदे मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास महायुतीसोबतच राहतील का? हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे.नव्या सरकारच्या स्थापनेसाठी महाराष्ट्रात राजकीय घाडमोडींना वेग आलाय. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.