Download App

जनता यावेळी नक्की संधी देईल, हेमंत रासनेंनी व्यक्त केला विश्वास

  • Written By: Last Updated:

Mahayuti Candidate Hemant Rasane For Kasba Assembly : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) अवघे काही दिवस उरलेले आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) आहेत. सध्या ते प्रचारार्थ मतदारसंघात सभा घेत आहेत. दरम्यान त्यांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. यावेळी हेमंत रासने यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. रासने म्हणाले की, गेली दहा ते बारा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. गाठीभेटी, प्रचार, दौरे सुरू आहेत. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पुण्यामध्ये पार पडली.

विकासाचा अजेंडा घेवून देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, असं महायुतीचे उमेदवार हेमंत रासने म्हणाले आहेत. तोच अजेंडा घेवून महायुतीचं सरकार काम करतंय. आम्ही देखील (Kasba Assembly) त्याच पद्धतीने काम करतोय, असं हेमंत रासने म्हणाले आहेत. गेल्या दोन वर्षात हेमंत रासने तीन निवडणुकांना सामोरे जात आहेत. मी कालही काम करत होतो, आजही करणार आणि उद्याही करणार, असं ते म्हणाले आहेत. पोटनिवडणुकीत निसटता पराभव झाला. हार जीत हा निवडणुकीचा भाग आहे. अनेकदा परिस्थिती पक्षाला अनुकूल असते, कधी व्यक्तीला अनुकूल असते, असं रासने म्हणाले आहेत.

मोठी बातमी! वडगाव शेरीत महायुतीला खिंडार, रेखा टिंगरेंसह अनेक भाजप कार्यकर्ते पवारांच्या पक्षात

मतदार हा राजा असतो, त्याला जो योग्य वाटतो तो निर्णय आपण स्विकारायचा असतो. सार्वजनिक जीवनात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही. मतदारांनी दिलेला कौल मी स्विकारला आहे. पोटनिवडणुकीत माझ्यावर 62 हजार मतदारांनी विश्वास टाकला. तो घेवून मी पुन्हा कामाला लागलो. माझ्यासोबत पक्षाचे शेकडो कार्यकर्ते खांद्याला खांद्या काम करत आहेत. 50 हजार जनतेच्या समस्या समजावून घेवून सोडवण्याचं काम केलंय. जनतेचा विश्वास संपादन करून येणाऱ्या निवडणुकीत त्याच विश्वासावर निवडणुकीत उतरलो आहे.

अजेंडा ठरलाय! हेमंत रासनेंनी केली कसब्याच्या विकासासाठी पंचसुत्री कार्यक्रमाची घोषणा, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत मोदीचं पंतप्रधान पाहिजे, यासाठी पुण्यातील एका बुथवर दुबईमधून लोकं मतदान करण्यासाठी आले होते. हा जो काही पक्षाचा निर्णय आहे, कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने प्रत्येकवेळी काही ना काही जबाबदारी दिली आहे. मिळालेली जबाबदारी अधिकार म्हणून वापरता, मी जबाबदारी म्हणून वापरली. त्यामुळे मला नेहमी संधी मिळाली, तिचं मी सोनं केलं. असं हेमंत रासने म्हणाले आहेत.

 

follow us