मोठी बातमी! वडगाव शेरीत महायुतीला खिंडार, रेखा टिंगरेंसह अनेक भाजप कार्यकर्ते पवारांच्या पक्षात
Rekha Tingre Join NCP Sharad Pawar Group In Wadgaon Sheri : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आलीय. वडगाव शेरीतीलील माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे (Rekha Tingre), सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा टिंगरे आणि खडकवासला मतदारसंघात बालाजी नगर येथील भाजप नेते समीर दिलीपराव धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार साहेब (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय.
वडगाव शेरी मतदारसंघामध्ये महायुतीला मोठं खिंडार पडलं आहे. माजी नगरसेविका रेखा टिंगरे, सुनील टिंगरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह (Sameer Diliprao Dhankawade) शरद पवार गटात प्रवेश केलाय. तसंच वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना विजयी करण्यात आमचं मोलाचं योगदान राहिल, असा शब्द देखील त्यांनी नेते शरद पवार यांना दिलाय.
“‘त्या’ बैठकीला अदानी नव्हते, मध्यस्थीही नाही”; दादांचा २४ तासांच्या आत यू टर्न
शरदराव पवार यांचे उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. वडगाव शेरीतील (Wadgaon Sheri) माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय.
दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद; चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार
रेखा टिंगरे वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र शरद पवार आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचे हात बळकट करण्यासाठी आता त्यांनी पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असल्याचं सांगितलं जातंय.