Mahayuti Government : मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
तर दुसरीकडे भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती मंत्रीपदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप नव्या सरकारमध्ये 20-22 मंत्रीपदं ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती मंत्रिपदं मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11-12 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8-10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्या पक्षाकडे कोणते खाते असणार याबाबत सध्या महायुतीमध्ये चर्चा सुरु असून येत्या काही दिवसात याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे गृह, महसूल, सामाजिक न्याय आणि नगरविकासखात्यांबाबत तिन्ही पक्षामध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप गृह, महसूल, नगरविकास, जलसिंचन, वने, वाहतूक, उच्च व तंत्र शिक्षण, गृहनिर्माण, सांस्कृतिक कार्य, आदिवासी विभाग, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, माहिती तंत्रज्ञान सारखे खाते स्वतः कडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
तर अजित पवार अर्थ, जलसंपदा, कृषी, अन्न व नागरी पुरवठा सारखी खाती आपल्याकडे ठेवण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न सुरु आहे. तर शिंदे सरकारमध्ये जी खाती शिवसेनेकडे होती ती खाती पुन्हा मिळावी यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
मोठी बातमी! बिहारमध्ये खान सरांना अटक, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
तर दुसरीकडे शिवसेना आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी येत्या बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार हे पाहावे लागेल.