शिंदे-फडणवीसांवर अण्णा हजारे खूश : म्हणाले, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल

अहमदनगर : राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. लोकायुक्त कायद्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हजारे म्हणाले, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. चांगला निर्णय घेतल्याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना सांगितले की, तुम्ही जो […]

Anna Hajre

Anna Hajre

अहमदनगर : राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. लोकायुक्त कायद्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हजारे म्हणाले, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. चांगला निर्णय घेतल्याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना सांगितले की, तुम्ही जो कायदा करत आहात त्याचे महत्त्व तुम्हाला आज कळणार नाही. कायदा झाल्यावर लोक जेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करतील, तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा निर्णय किती क्रांतिकारक आहे. माहिती अधिकार कायद्याच्यावेळी लोकांनी मला वेड्यात काढले होते. आता त्यांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व कळते,असे मी त्यांना सांगितले.

समाजासाठी, देशासाठी काही चांगले करायचे असेल तर महाराष्ट्राची परंपरा आहे. २०११मध्ये आंदोलन झाले. त्यातून लोकपाल, लोकायुक्त कायदा संसदेत मान्य झाला. आता प्रत्येक राज्याने आपल्या राज्यात लोकायुक्त स्थापन करायचा. ही राज्यातील लोकांची जबाबदारी आहे.

एका बाजूला फडणवीसांनी आम्हाला आश्वासन दिले. ते पाळण्यात आले नाही.ठाकरे सरकारने आश्वासन दिले तेही पाळले गेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला मी निर्वाणीचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आश्वासन पाळल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version