Download App

Manoj Jaranage यांचं देहू, आळंदीत पहाटे 3 वाजता जंगी स्वागत; भुजबळांवर पुन्हा साधला निशाणा

  • Written By: Last Updated:

Manoj Jaranage : मनोज जरांगे (Manoj Jaranage ) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यात रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या देहू आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीला भेट दिली. त्यावेळी पहाटे 3 वाजता जंगी स्वागत करण्यात आलं त्यावेळी देखईल मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तर यावेळी जरांगेंनी भुजबळांवर पुन्हा निशाणा साधला.

काय म्हणाले मनोज जरांगे?

आळंदीच्या सभेमध्ये जरांगे यांनी बोलताना भुजबळांवर पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच त्यांना विरोध नव्हता. मात्र आता त्यांना व्यक्ती म्हणून देखील माझा विरोध आहे. ते ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणून मी काही बोलत नव्हतो. पण मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यामुळे आता काही खरं नाही.

IND VS AUS Final: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या घरी ईडीचा छापा; भारतीय संघाच्या पराभवानंतर मोईत्रांचा भाजपला टोला…

दरम्यान यावेळी या सभेच्या अगोदर जरांगे यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं तसेच आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसेच सरकारला महाराजांच्या ओवीची आठवण करून दिली. सरकारला सद्बुद्धी मिळो असे साकडे देखील यावेळी त्यांनी माऊलींचे चरणी घातल्याचं दिसून आलं. तसेच जरांगे यावेळी म्हणाले, जो वारकरी संप्रदाय कधीही कोणत्या मुद्द्यांमध्ये भूमिका घेत नाही. त्यांनी देखील आरक्षणाला पाठिंबा दिला. त्यामुळे देवानेच आपल्याला कौल दिलाय.

World Cup Final : ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरवर गावसकर भडकले; नेमकं काय घडलं ?

या अगोदर जरांगे यांची कोल्हापुरात सभा झाली. या सभेला संभाजीराजे येणार नसल्याची चर्चा होती. मात्र, शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje Chhatrapati) जरांगेच्या सभेला हजेरी लावली. त्यांची ऐतिहासिक दसरा चौकात जाहीर सभा झाली. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हजर होते. या सभेला छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. मात्र, संभाजीराजे या सभेला येणार नाहीत, असं बोललं जातं होतं. मात्र, असं होणार नाही. संभाजीराजेंवर आमचा हक्क आहे. ते आमच्या पाठिशी आहेत,. अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली होती. त्यानंतर संभाजीराजेंनी या सभेला हजेरी लावली. यातून संभाजीराजेंचा जरांगेंना पाठिंबा असल्याचं दिसून आलं.

Tags

follow us