IND VS AUS Final: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या घरी ईडीचा छापा; भारतीय संघाच्या पराभवानंतर मोईत्रांचा भाजपला टोला…
IND VS AUS Final: विश्वचषकाच्या अंतिम (IND VS AUS ) सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. त्यानंतर राजकीय मैदानात चांगलीच टोलेबाजी रंगली.
World Cup Final : ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरवर गावसकर भडकले; नेमकं काय घडलं ?
यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये आले होते त्यावरून राजकीय टोलेबाजी देखील चांगलेच रंगल्याचे पाहायला मिळालं यामध्ये पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्टेडियमच्या नावावरून देखील चांगले स्टोरी बाजी केले तर पाहायला मिळालं.
काय म्हणाल्या मोईत्रा?
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भारतीय संघाच्या पराभवानंतर एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी सामना पाहायला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टेडियमच्या नावावरून चांगलीच टीका केल्याचे पाहायला मिळालं. त्या म्हणाल्या, इतर बातम्या अहमदाबाद स्टेडियम चे नाव बदलले जाणार जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघ विश्वशाशकाचा अंतिम सामना हरला. आणि ब्रेकिंग न्यूज ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या घरी ईडीचा छापा.
In other news:
Ahmedabad Stadium has been renamed – India loses World Cup finals at Jawahar Lal Nehru Cricket Stadium.
And.. pic.twitter.com/oCaD4w6XqK— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 19, 2023
अशी जोरदार टोलेबाजी महुआ मोईत्रा यांनी केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच महुआ मोईत्रा यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या (Cash For Query) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडणचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मोईत्रा यांची खासदारकी जाईल की (Mahua Moitra) राहिल याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस संसदेच्या शिस्तपालन समिताने केली आहे. याबाबतचा अहवाल 6 विरुद्ध 4 फरकाने अहवाल स्वीकारण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप पटकावला, टीम इंडियाचे काय चुकले?
संंसदेत सरकारला प्रश्न विचारण्याच्या मोबद्ल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप खासदार मोईत्रा यांच्यावर आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेवसाइटवरील त्यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांना शेअर केल्याचे मान्य केले होते. तसेच जर रोख स्वरुपात पैसे दिले जात असतील तर त्याची तारीख आणि संबंधित पुरावे देखील सादर करा, असे आव्हान खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले होते.