Manoj Jarange On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता विसरभोळा मंत्री झालायं, तो अंधश्रद्धदा बाळगतोयं, ह्याला नेपाळ, नागालॅंडला सोडायला हवं, असो खोचक पलटवार मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतचा जीआर काढल्यानंतर लातूरच्या एका ओबीसी बांधवाने आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर ओबीसी बांधवाच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मंत्री भुजबळ गेले तेव्हा त्यांनी जरांगेंवर टीकेची तोफ डागली. या टीकेला जरांगेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलंय.
ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; मुंबई महानगरपालिकेने दिली परवानगी
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, तू 32 टक्के खातोस असा मंत्री देशात आहे का? आत्तापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लंय, ते आम्ही परत घेत आहोत. गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे.या शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केलायं.
तुला आरक्षण रद्द करायचं आहे का? तू इतके दिवस खात होता, ते रद्द करायचं का तू प्रगत झाला तू ते आरक्षण सोड ना. तुझं अजूनही पोट भरत नाही का भरत्या शिक्षण, सगळं यानेच खाल्लंय, राजकारणापायी ओबीसींना हे उलटे समजावून सांगत आहेत, त्यांचं ऐकून नकाक हा मेटाकुटीला आला असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय.
…अन् शिल्पाला बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या; ‘मस्ती की पाठशाला’ थीमसह बालपणाचा उत्सव…
मुंबईत मराठ्यांची पोरं गेली. महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली. मुंबईचे खरे मालक ही पोरं होते. तिथले लोकं पाहुणे आहेत. ह्यो इथं शोभत नाही, ह्या जनावराला नेपाळ, नागालॅंड, इंग्लंडला सोडायला पाहिजे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी खोचक टीका केलीयं.
छगन भुजबळ काय म्हणाले होते?
सरकारने मराठा आरक्षण देखील 10 टक्के दिलंय. मात्र आता ते म्हणतात आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. पण आमच्याकडे 17 टक्के आरक्षण शिल्लक राहिल आहे. अशात देशातील सर्वात मोठ्या कोर्टाने सांगून देखील ते ऐकायला तयार नाही. जे खरं कुणबी असतील तर त्यांना द्या. शिंदे कमिटीने लाखो कागद तपासले. कुणबी प्रमाणपत्र दिले आम्ही शांत बसलो. आम्ही काय पाप केलं? लहान समाजात जन्म झाला हे पाप आहे का? आम्ही शिक्षण घ्यायचं नाही का? असे सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते.