Download App

येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढू; मनोज जरांगे पाटलांचा नाव न घेता भुजबळांवर पुन्हा निशाणा

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, येवल्याचा माणून तलवार काढा म्हणतोय.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Manoj Jarange Patil Press :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी डॉ. तारख यांच्यावर झालेल्या हल्लाबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले डॉ. तारख यांना काही लोकांनी काळं फासलं. (Maratha Reservation) त्या घटनेचं मला वाईट वाटलं. आंदोलनाला गाल बोट लावण्याचं काम चांगलं नाही. शेवटी समाजाचं आंदोलन आहे. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडवणीस यांनी दखल घेतली असेल. पोलीस बंदोबस्त वाढवला असेल. (Chhagan Bhujbal) कारण येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढू. जर कुणी असं म्हणत असतील तर दंगल होण्याची भीती निर्माण होते अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ओबीसींचे नेते सर्व एक झाले मोठी बातमी : केजरीवालांचा मुक्काम तुरूंगातच राहणार; दिल्ली HC ची जामीनावर स्थगिती कायम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांचं अनेक दिवस जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू होतं. ते काही काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला आले होते. नुकतंच त्यांनी मी एकटा पडलो आहे असंही विधान केलं होतं. त्यानंतर त्या विधानावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावरही पाटील यावेळी बोलले आहेत. मराठ्यांचे राज्य आहे आणि मग मराठ्यांवर अन्याय का? मी एकटा पडलो नाही. मला आता मराठ्यांचे नेते फोन करत आहेत. ओबीसींचे नेते सर्व एक झाले आहेत. मग मराठे का एकत्र येत नाहीत म्हणून मी एकटा पडलो आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

मग मराठ्यांवर अन्याय का?

आता मी थेट अंतरवाली सराटीला जाणार आहे. देवाचं दर्शन घेणार आहे. दरम्यान, राज्यातील सर्वच लोकं म्हणत आहेत की हे मराठ्यांचं राज्य आहे. तर मग मराठा समाजावर अन्याय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मी धनगर बांधवांना आणि यांच्या नेत्याला विरोधक मानत नाही. पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभराजे देसाई म्हणाले आहेत 13 जुलै पर्यंत थांबा त्यामुळ मी शांत आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे काय म्हणाले? वाद वाढला! राजनाथ सिंहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर; म्हणाले, मी खर्गेंबरोबर..

मला किंवा समाजाला वेड्यात काढू नका. नाही तर मराठा समाज म्हणेल आम्हाला फसवलं. तुम्ही 70 वर्षांपासून फसवे सरकार आहेत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही दिलेली सग्या सोयऱ्याची व्याख्या पाहिजे. आम्हाला हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट आणि 33/34 च्या नोंदी लागू केल्या. तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल,. तसं पाहिलं तर एका ओळीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही ते घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज