Download App

बेईमानी…शिंदे समिती बरखास्त, नुसते खलबतं सुरू; जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या सहा दिवसाच्या काळात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सर्वांनी सामूहिक उपोषण केलंय. इतके दिवस लागतील असं कोणाला (Maratha Reservation) वाटतंही नव्हतं. पण सरकारकडून मुख्यमंत्र्‍यांकडून मनातून करायचं नसेल, बेईमानी करायची असेल तर एक दिवसही लागत नाही. यांनी मराठा आरक्षणासाठी तयार केलेली शिंदे समिती देखील बरखास्त केलीय.

कर्मचाऱ्यांमध्ये भीती, जिल्ह्याची बदनामी थांबावी धनंजय मुंडेंची अजितदादांकडे मागणी

वंशावळ समिती देखील बरखास्त केली होती, ती पुन्हा गठित केलेली नाही. आपल्या मुळावर कुठेकुठे घाव घातलाय, हे माहित असणं गरजेचं आहे. हैद्राबाद आणि बॉम्बेच्या चार गॅझेटमध्ये 80-82 टक्के महाराष्ट्र व्यापेल इतक्या नोंदी (Manoj Jarange Patil Protest) आहेत. तीन दिवसांपासून नुसता निरोप आहे, आम्ही शिंदे समिती गठित करू. एखाद्या गोरगरिब समाजाला किती घुमवायचं याला मर्यादा असतात. केस मागे घेतो, गॅझेट लागु करतो अशी फक्त खलबतं तीन दिवसांपासून सुरू आहेत.

ठाकरेंना धक्का! नगरचे शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना; आज शिंदे गटात प्रवेश

बलिदान दिलेल्या कुटुंबाला मदत देतो आणि नोकरी देतो, अशी देखील खलबतं सुरू आहेत. नोंदी शोधण्यासाठी जे कक्ष होते आपले, ते ताबडतोब प्रमाणपत्र देत होते. गरिबाला ताण होत नव्हता, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्याला आणखीन जोड मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिला होता, त्यांनी गाव लेव्हलवर अभियान राबवलं होतं. आता हे म्हणत आहे, ते सुरू करतो. जर कदाचित एक वर्ष मुदतवाढ शिंदे समितीला दिली तर नोंदी शोधायचं काम सुरू केलं तर होईल का? शिंदे समिती मुदतवाढ दिल्यावर काम करत नाही, समजून घ्या असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यावर सलग नोंदी शोधायच्या, यावर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी चोवीस तास लक्ष ठेवायचं असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलंय. तिथे जावून आपल्या मोडी अभ्यासकांनी नोंदी सापडायच्या असा नवीन पायंडा पाडू. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस देखील आंतरवाली सराटीत उपस्थित होते. एकट्या गेवराई तालुक्यात 113 गावं कुणबी म्हणून निघालेत. गॅझेट लागू करतो, शिंदे समिती सुरू करतो, असं ते म्हणाले आहेत.

 

follow us