Download App

निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मराठे फॅक्टरमुळेच 204 आमदार…

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil Reaction After Assembly Election Result : राज्यात काल 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार फटका बसल्याचं समोर आलंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Assembly Election Result 2024) अपेक्षित यश मिळालं नव्हतं, त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने सावधगिरीने कामगिरी करत चांगलं यश मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झालंय. दरम्यान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची निकालानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

महायुतीने 288 पैकी 230 विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही योजना मोठी गेम चेंजर ठरली. त्याचबरोबर ओबीसी आणि हिंदुत्ववादी मतांच्या एकत्रीकरणामुळे महायुतीची ताकद वाढल्याचं समोर आलंय. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणा देखील मोठ्या गेमचेंजर ठरल्या आहेत. भाजपने राज्यात 132 जागा जिंकून आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसची कामगिरी सर्वात वाईट ठरली आहे.

“मी मोदी साहेबांना म्हटलं माझा आमदार..”, अजितदादांनी सांगितला शेळके-मोदी भेटीचा किस्सा!

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर हिट झाला होता तर विधानसभा निवडणुकीत मात्र मनोज जरांगे पाटील सपशेल फेल झालाय. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. आम्ही मैदानातच नाही, तर तुम्ही आम्हाल फेल झालं म्हणता, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, त्याचं आम्हाला काही सोयरं सुतक नाही. तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली आहेत. परंतु ठीक आहे, उद्या आमचा आहे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे.

“मी मोदी साहेबांना म्हटलं माझा आमदार..”, अजितदादांनी सांगितला शेळके-मोदी भेटीचा किस्सा!

एक महिन्याभर थांबा , मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीमध्ये 204 मराठा आमदार झालेत. मराठा मतांशिवाय कोणीही सत्तेत येवू शकत नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा फॅक्टरला बघूनच मराठा उमेदवारांना तिकीट दिलं, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. जेवढ उमेदवार निवडून आलेत, त्यांच्यामागे मराठा फॅक्टर आहे, असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. जरांगे फॅक्टर अन् मराठा फॅक्टर कळायला सगळी हयात जाईल, असा टोला त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.

 

follow us