पवन कल्याण राजकारणतही ठरले ‘सुपरस्टार’; महाराष्ट्रात ज्यांच्यासाठी सभा घेतली त्यांना लागला गुलाल
Pawan Kalyan Sabha in Maharashtra : तेलुगु सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मराठीतून भाषण केले. (Pawan Kalyan) अगदी काही मिनिटांच्या या मराठी संवादाने त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिकंली. त्यांच्या भाषणानं एक औरच रंगत आणली होती. यावेळी जनतेतून टाळ्या, शिट्यांनी मैदान दणाणून गेलं होतं. त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
Election Result 2024 : महाराष्ट्राची कमान कोण सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढं?
पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यात पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली. या सभेतील त्यांचे मराठीतील भाषण चांगलेच गाजले. भोकर येथील भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. त्यानंतर जितेश अंतापुरकरांसाठी त्यांनी देगलूर येथे सभा घेतली यातील सर्व उमेदवारांचा विजय झाला असल्याने आता त्यांच्या सभांची मोठी चर्चा रंगली आहे.
मराठीतून केली भाषणाची सुरुवात
या सभेत पवन कल्याण यांच्या भाषणाची सर्वाधिक चर्चा झाली. मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा अशी सुरूवात त्यांनी केली. संतांची भूमी, वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र, या भूमीतील संतांना, छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. माझ्या लाडक्या भावांना, लाडक्या बहिणींना नमस्कार करतो. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आलं, याचा मला आनंद आहे. रामराम महाराष्ट्र. या मराठ्यांच्या भूमीत सन्मान आहे. स्वराज्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे, असं पवन कल्याण म्हणाले होते.
या सभांवेळी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं. जनसेने या आपल्या पक्षाच्या सात तत्त्वांपैकी एक राष्ट्रवाद आणि प्रादेशिकता यांचे मिश्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांनी प्रेरित असल्याचे ते म्हणाले होते. लाडक्या बहीण योजनेचे त्यांनी कौतुक केलं. या योजनेमुळे महिलांची आर्थिक उन्नती होईल असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उमेदवारांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचं आवाहन केलं होतं.