Download App

तर भाजपच्या 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार अन् फडणवीसांनाही उलटेपालटे..; जरांगेंचा इशारा

मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्यास भाजपच्या 65 ते 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीतून (Maratha Reservation) आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारला 13 जुलैची मुदत दिली होती. ही मुदत संपून आठवडा उलटला तरीही मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं मनोज जरागेंनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसरले. दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास भाजपच्या (BJP) 65 ते 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा दिला.

बांगलादेशातील पीडितांनी पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तर…; CM ममता बॅनर्जींचं मोठं विधान 

अंतरवली सराटी येथील उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अंमलबजावणी करून त्याचे कायद्यात रूपांतर न केल्यास आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्यास या निवडणुकीत मराठा समाज भाजपच्या 65 ते 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असं जरांगे म्हणाले.

ऑलिम्पिक खेळाडूंसाठी BCCI ने उघडला खजिना, 8.5 कोटींची मदत देण्याची जय शाहांची घोषणा 

फडवणीसांना उलटेपालटे करू
पुढं बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मराठा काहीही करू शकतात. भाजपच्या सर्व उमेदवारांना पाडून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनाच निवडून आणू. देवेंद्र फडवणीस हे अवघ्या 79 हजार मतांनी निवडून आले. यंदा मराठे त्यांना उलटेपालटे करू शकतात, असंही जरांगे म्हणाले.

यावेळी जरांगेंनी प्रवीण दरेकरांवरही टीका केली. ते म्हणाले, प्रवीण दरेकर यांना जातीपेक्षा नेता आणि पक्ष जवळचा असून, आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा डाव दिसतोय. फडणवीस यांनीच दरेकरांना आपल्या अंगावर सोडलं आहे. हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत, तेच दरेकरांना बोलायला सांगत आहेत, अशा शब्दात जरागेंनी फडणवीस आणि दरेकरांवर हल्लाबोल केला.

https://www.youtube.com/watch?v=PZMv_d0e7RU

सरकारी शिष्टमंडळे येतात-जातात. आमची चह-बिस्कीटं खातात. त्याची उधारी कोणी द्यायची, अशी टीकाही जरांगेंनी केली.

follow us