Download App

आम्हाला आरक्षण नाही, मग आम्ही किती तयारी दाखवू; जरांगेंचा ओबीसींना थेट इशारा

आरक्षण असूनही भांडणं करायची तयारी, मग आम्हाला नाही तर आम्ही किती तयारी दाखवू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी ओबीसी बांधवांना दिला आहे.

Manoj Jarange Patil: तुम्हाला आरक्षण असूनही भांडणं करायची तयारी, मग आम्हाला नाही तर आम्ही किती तयारी दाखवू, असा थेट इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी ओबीसी बांधवांना दिला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मराठा आंदोलन स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचारानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीत दाखल होत उपोषणस्थळावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

मोठी बातमी : केजरीवालांचा मुक्काम तुरूंगातच राहणार; दिल्ली HC ची जामीनावर स्थगिती कायम

मनोज जरांगे म्हणाले, राज्यातील एकही ओबीसी नेता मराठा समाजाला विरोध करीत नाही, फक्त एकच नेता छगन भुजबळ हा मराठ्यांना विरोध करीत आहे. छगन भुजबळ राज्यात दंगली घडवण्याचं काम करीत असून तुम्हाला आरक्षण असूनही तुम्ही भांडणं करायची तयारी दाखवत आहात, आम्हाला तर आरक्षण नाही मग आम्ही किती दाखवू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिलायं.

18 व्या दिवशीही Munjya ची जादू कायम! बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच

मराठ्यांना जेवढा विरोध करायचा तो करा मराठा काहीही बोलणार नाही. ओबीसी समाजाला 1967 ला आरक्षण मिळालंय. हे आरक्षण स्वातंत्र्यानंतर मिळालं असून उरलेल्या ओबीसींना 1990 ला आरक्षण मिळालं आहे. 1884 पासूनच मराठ्याचं आरक्षण आहे, तुम्ही आधी आरक्षणात आले आहेत. तुम्हा आधी आले तरीही आम्ही विरोध केला नाही. तुम्ही आरक्षणात नसूनही आरक्षण मिळालं. तुमचं तुम्हाला राहु द्या तुमच्या आरक्षणाला आम्ही हात लावत नाही हे आरक्षण आमचं आहे ते तुम्ही घेत आहात तरीही विरोध करता ही तुमची दादागिरी असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

दोन दिवस थांबा, मोठ स्पोट होणार आहे, 5 हजार कोटींपेक्षा जास्त…; रोहित पवारांचं खळबळजनक विधान

दरम्यान, आमच्याकडे हैद्राबाद संस्थानच्या निजामाच गॅझेट आहे. 1967 ला आरक्षण दिलं गेलं तेव्हा कुणबी सुद्धा होते. आम्ही ओबीसीतून कोणाचंही आरक्षण घेत नसून तुमच्या आधी 150 वर्षांपासून आम्हाला आरक्षण असल्याचं मनोज जरांगे यांनी ओबीसींना
सांगितलं आहे.

follow us