Download App

Ajit Pawar : ‘मनुस्मृतीच समर्थन नाही’ अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Ajit Pawar : उद्यापासून (26 जून) पासून राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : उद्यापासून (26 जून) पासून राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होणार नाही अंस स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून विरोधक महायुती सरकारवर टीका करत होते मात्र आज अजित पवार यांनी पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होणार नाही असं स्पष्ट केले आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा (Manusmriti) समावेश होणार नाही. महाराष्ट्रात मनुस्मृतीला कोणताही थारा नाही, विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मनुस्मृतीला कोणताही थारा नाही हे माहिती असताना देखील विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा राजकारण विरोधकांकडून होत आहे अशी टीका देखील यावेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर केली.

पुढे अजित पवार म्हणाले, महायुती सरकारच्या कुठल्याही नेत्याने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा समर्थन केलेला नाही. उलट राज्य सरकारचा चुकीच्या प्रवृत्तीला विरोध आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. 26 जून म्हणजे सामाजिक न्यायचे जनक शाहू महाराजांची 150 वी जयंती आहे.

‘गद्दारीचा ठसा पुसण्यासाठीच CM शिंदेंनी जरांगेला पुढं आणलं’; नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप

शाहू महाराजांनी या देशातील दुर्मिळ घटकांसाठी पहिल्यांदा कायदा केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ निर्माण केले. त्यांचा वारसा पुढे नेत असताना राज्यात मनुस्मृतीला स्थान नाही असेही अजित पवार म्हणाले. तसेच 28 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.

follow us