‘गद्दारीचा ठसा पुसण्यासाठीच CM शिंदेंनी जरांगेला पुढं आणलं’; नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप

‘गद्दारीचा ठसा पुसण्यासाठीच CM शिंदेंनी जरांगेला पुढं आणलं’; नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप

Navnath Waghmare : गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजामध्ये घुसपेट करण्याचा प्रयत्न एका समाजाकडून होत आहे. या समाजाकडे 200 पेक्षा जास्त आमदार, 32 खासदार आणि राज्याचे 200 पैकी 90 टक्के कारखाने यांच्याकडे आहे तसेच ईडब्ल्यूएस (EWS) अंतर्गत त्यांना शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण आहे मात्र तरीही ओबीसीच्या आरक्षणात घुसपेट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना पुढे करत ओबीसीवर दबाव टाकण्याचा काम सुरु केला आहे असा गंभीर आरोप आज नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजशे टोपे यांच्यावर केला आहे.

राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. आज एका कार्यक्रमात बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवनाथ वाघमारे म्हणाले, गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेला समोर करून मराठा समाजाला जवळ करण्याचे काम करत आहे. मात्र जरांगेला कुठलाही अभ्यास नाही. ते काय बोलतात हे कुणालाच समजत नाही. कुंभार आणि सुतार समाजाला ते ओबीसीमधून आरक्षण द्याची मागणी करत आहे मात्र कुंभार आणि सुतार समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात आले आहे.

ब्राह्मण समाजाला संपवण्याची भाषा करणारा मनोज जरांगे आज ब्राह्मण समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहे असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

तर राज्यात ओबीसींच्या व्यवसायावर हल्ले करण्यात येत आहे. ओबीसी मंत्र्यांना आणि आमदारांना धमक्या देण्याचे काम जरांगे यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी वेळी केला. तसेच जरांगे यांनी संविधान आणि मंडळ आयोगाचा अभ्यास करावा आणि त्यानंतर आरक्षणाची मागणी करावी असा टोला देखील त्यांनी यावेळी जरांगे यांना लावला.

सरकार तुमची आहे, आमदार तुमचे आहे म्हणून काहीही करता येणार नाही, सरकार संविधाननुसार चालणार आणि तो संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे. त्यामुळे मी जरांगे यांना आव्हान देतो तुम्हाला ओबीसी आरक्षणाला धक्का लावता येणार नाही. जरांगे यांच्या गावात देखील 70 टक्के समाज ओबीसी आहे मात्र तिथे देखील त्यांना भीती दाखवण्याचा काम होत आहे. मात्र आम्हाला 29 टक्के आरक्षण घटनेने दिला आहे त्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागला नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे. असेही वाघमारे म्हणाले.

संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा देणाऱ्या ओवैसींची जाणार खासदारकी? थेट राष्ट्रपतींना पत्र

आम्ही दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही मात्र त्यांना आमचाच आरक्षण का? पाहिजे असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. जेव्हापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यपाल ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लिखित स्वरूपात लिहून देत नाही तो पर्यंत आपला आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा देखील यावेळी नवनाथ वाघमारेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज