Download App

फडणवीस नाहीतर तर मग कोण? लाठीचार्जवर मनोज जरांगेंचा खडा सवाल

Manoj Jarange Patil : लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी नाही दिले तर मग मधला माणूस कोण? असा खडा सवाल मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी दिले आहेत. दरम्यान, जालन्यातील अंतरवली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या प्रकरणी लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालं आहे. त्यावर कल्याणमधून संवाद साधताना मनोज जरांगेंनी सवाल केला आहे.

Jhimma 2: नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं ‘झिम्मा 2′ मधील ‘पुन्हा झिम्मा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

मनोज जरांगे म्हणाले, लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी नाही दिले मग मधला माणूस कोण? लाठीचार्जचे आदेश देणारा माणूस कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोधून काढावं, याबद्दल आम्ही उद्या बोलणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Dhangar Reservation : मोठी बातमी! राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, धनगर आरक्षणासाठीचं चौंडीतील उपोषण मागे

तसेच सरकार बनून गैरवापर कोणी केला? त्याला बडतर्फ करुन त्याची चौकशी झाली पाहिजे. लाठीचार्च करुन जनतेवर निष्पाप लोकांवर हल्ला करणाऱ्यांना बढती मिळत असेल तर त्याच्यावर न्यायालयीन चौकशी केली पाहिजे, लाठीचार्ज प्रकरणातून कोणालाच सुट्टी मिळणार नाही. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात बोलणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Mohit Kamboj : खरे मर्द असाल तर… बावनकुळेंच्या फोटो अन् व्हिडिओच्या दाव्यावर कंबोज यांचं राऊतांना आव्हान

राज्यात मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली आहेत. मी दोन वेळी उपोषण केलं आहे. सरकारला मी दोनवेळ मुदत दिलीयं. राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भातील माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा दुसरा अहवाल सादर करावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे शब्द दिलेत ते लवकरात लवकर पूर्ण करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात आलोयं म्हणून बोलत नाही….”मी भीत बीत नसतो”… असं मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे, हे मी आधीही बोललो होतो, मी उगाच कोणाची प्रशंसा करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना वेळेच्या आत आरक्षण द्यावं, नाहीतर 25 डिसेंबरनंतर मराठ्यांना विश्वासात घेऊन आंदोलन काय करायचं हे मराठ्यांना सांगण्यात येईन
सरकारने दक्षत घ्यावी कारण तेव्हाचं आंदोलन तुम्हाला झेपायचं नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

Tags

follow us