‘मी भीत-बीत नसतोयं’; CM शिंदेंच्या ठाण्यात जाऊन मनोज जरांगेंनी सांगितलं…
Manoj Jarange patil : मी भीत-बीत नसतोयं, असं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाऊन सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणानंतर आता जाहीर सभांचा धडाका सुरु केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत मनोज जरांगे यांच्या सभांचं आयोजन करण्यात येत आहे. या सभांमधून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारसह मराठा आरक्षणविरोधी नेत्यांना घेरत असल्याचं पाहायला मिळतयं. अशातच आज ठाण्यात मनोज जरांगे यांनी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेला मराठा समाजाचा विरोध; मुख्यमंत्री म्हणाले…
मनोज जरांगे म्हणाले, राज्यात मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली आहेत. मी दोन वेळी उपोषण केलं आहे. सरकारला मी दोनवेळ मुदत दिलीयं. राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भातील माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा दुसरा अहवाल सादर करावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे शब्द दिलेत ते लवकरात लवकर पूर्ण करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात आलोयं म्हणून बोलत नाही….”मी भीत बीत नसतो”… असं मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून म्हटलं आहे.
T20 मालिकेसाठी टीम इंडियात मोठे बदल; सूर्या नवा कर्णधार, पाहा प्लेईंग-11
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे, हे मी आधीही बोललो होतो, मी उगाच कोणाची प्रशंसा करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना वेळेच्या आत आरक्षण द्यावं, नाहीतर 25 डिसेंबरनंतर मराठ्यांना विश्वासात घेऊन आंदोलन काय करायचं हे मराठ्यांना सांगण्यात येईन
सरकारने दक्षत घ्यावी कारण तेव्हाचं आंदोलन तुम्हाला झेपायचं नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
सलोनी बत्रा साकारणार रणबीरच्या बहिणीची भूमिका; ‘या’ सिनेमाच्या पडद्यामागील फोटो Viral
छगन भुजबळांना सुनावलं :
ते म्हातारं म्हणतंय की, मला वाचता येत नाही. मला अभ्यासाची गरज असल्याचं ते म्हणतंय. आरक्षणाचा आणखी अभ्यास करावा लागणं असंही म्हणतंय. मराठ्यांचं लेकरु म्हणून लढलो अन् आरक्षण आणलं मराठ्यांनी हे महत्वाचं. वाचतो कव्हर तूच एकटा वाचित बस, मध्ये वाच आत्ता बाहेर आल्यावरही वाच… या शब्दांत जरांगे पाटलांनी भुजबळांना सुनावलं आहे.