Mohit Kamboj : खरे मर्द असाल तर… बावनकुळेंच्या फोटो अन् व्हिडिओच्या दाव्यावर कंबोज यांचं राऊतांना आव्हान

Mohit Kamboj : खरे मर्द असाल तर…  बावनकुळेंच्या फोटो अन् व्हिडिओच्या दाव्यावर कंबोज यांचं राऊतांना आव्हान

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना खुल आव्हान दिलं आहे. कारण राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्हायरल फोटोनंतर त्यांचे आणखी 27 फोटो आणि ५ व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यावर कंबोज हे राऊतांविरोधात मैदानात उतरले आहे.

काय म्हणाले भाजप नेते मोहित कंबोज?

महाराष्ट्राचे पोपट मिया सलीम संजय राऊत यांना खुल आव्हान देतो. तुम्ही म्हणत होतात की, महाराष्ट्रचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे तुमच्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत. त्यामुळे मी राऊत यांना आव्हान देतो आहे की, राऊत हे खरे मर्द असाल तर त्यांनी बावनकुळेंचा फक्त एक फोटो पोस्ट करून दाखवावा. असं बोलत मोहित कंबोज भारतीय यांनी राऊतांना खुल आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले होते खासदार संजय राऊत?

आम्ही फोटोवरुन विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे द्या, ते कुटुंबासोबत म्हणताहेत पण फॅमिली चायनीज आहे काय? माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आहेत, पण आमच्यात माणुसकी आहे, म्हणून थोडी गंमत केलीयं, सगळंच बाहेर काढलं तर भाजपचं दुकानच बंद पडणार असल्याची जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘शेर बनकर दहाड़ेगा बाजीराव…’; ‘Singham 3’ सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक रिलीज

राऊत म्हणाले, आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही. महाराष्ट्रातील एक नेते दिसत आहेत. त्या व्यक्तीने सांगावं की तो मी नव्हे. लोकं ओळखतात त्यांना असं मला कळलं. तेलगीने एका दिवसात 1 कोटी उडवल्याचं मला माहिती होतं. पण, महाराष्ट्रातील एक माणूस मकाऊमध्ये साडेतीन कोटी उडवतो. म्हणजे अच्छे दिन आले आहेत, असा टोमणा संजय राऊतांनी लगावला.

26/11 Mumbai Attacks : ‘इस्त्रायल’चा मोठा निर्णय! ‘लष्कर ए तैयबा’ आतंकवादी संघटना घोषित

बावनकुळेंच्या फोटोंचं प्रकरण काय?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधील कथित जुगार खेळतानाचा फोटो विरोधकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून भाजप आणि बावनकुळेंवर यावरून टीका करण्यात येत आहे. त्यात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना त्यांचे कथित फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube