Sanjay Raut : ‘दिडदमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडतात, भाजपा म्हणजे’… राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. आज परत त्यांनी तोच फोटो ट्विट करत भाजपवर खोचक टीका केली. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. काल मी एक ट्विट केला फोटो प्रसिद्ध केला मी त्यात कोणता पक्ष नेता संघटना याचं नाव घेतलं नाही. त्यात महाराष्ट्रातील व्यथा सांगते अशा वेळेला महाराष्ट्रातील जवाबदार व्यक्ती चीनच्या मकाऊ येथे जुगार खेळत होता, तिथे पिझ्झा खायला कुणी जात नाही. मी कुठे म्हटलं की तिथे बसणं गुन्हा आहे पण खोटं बोलणं गुन्हा आहे. भाजपने हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. जे छायाचित्र प्रसिद्ध झालं त्यात कुटुंब कुठेही दिसत नाही. जे दिडदमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडत आहेत. तर त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवं होतं की हो तो मीच आहे.
Sanjay Raut : अजितदादा अन् शरद पवार सामन्यात विनर कोण? राऊत म्हणाले, निवडणुकीत..
भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी आहे. फडणवीस यांनी केलेली टीका योग्यच आहे. मी मनोरुग्ण आहे. कारण, महाराष्ट्राच्या हिताचा विचार आम्ही करतो. त्यामुळे आम्ही मनोरुग्ण आहोतच. आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात घालण्याला विरोध करत आहोत. एका उद्योगपतीला मुंबई विकण्याला विरोध केल्यामुळे आम्ही मनोरुग्ण वाटणार असू तर आम्ही आहोत मनोरुग्ण असे राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या हातातील ग्लासात मोदी जो पितात तोच ब्रँड
लंडनला आमदाराचं शिष्टमंडळ गेलं आमदारांना वाटलं अशाप्रकारच्या जागेचा अभ्यास करावा. आदित्य ठाकरे जे पीत आहे ते डायट कोक आहे. मोदी जे पितात ते आदित्य ठाकरे पितात. ईडी सीबीआय पोलिस असताना भाजप इतका का घाबरला असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. हो आम्ही मानसिक रुग्ण आहोत. आपल्यासारख्या व्यक्तींपासून महाराष्ट्र वाचवायचा ही आमची मानसिकता आहे. दंगल घडवणयाची मानसिकता त्यांची आहे. आम्हाकडे बाळासाहेबांचे विचार आहेत आम्ही कुणाच्या घरी जात नाही.लोकांना नैतिकतेच्या गोष्टी करणारे हे भारतीय जुगार पार्टी आहे. भाजप भ्रष्ट पार्टी आहे, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.
Sanjay Raut : शिवतीर्थावर औरंग्याच्या पिलावळीने;.. राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतले
महाराष्ट्रातील जबाबदार व्यक्ती चीनच्या अखत्यारितीत जाऊन जुगार खेळत आहे. आणि उलट पुन्हा महाराष्ट्रात आम्हाला ज्ञान देणार. भाजपला हे अंगावर ओढून घेण्याची काहीच गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी असे सांगतात की फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतले. बावनकुळे यांच्यासमोर पिझ्झा , सँडविच नाही. पोकर्स आहेत. गॅम्बलिंगमध्ये जी करन्सी लागते त्याला पोकर्स म्हणतात. त्या महाशयांसोबत आणखी लोक होते.
भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी
भाजपा ही भारतीय जुगार पार्टी आहे. हे वेडे लोक आहेत. भाजपासारख्या लोकांच्या विरोधात आम्ही लढतोय म्हणून आम्ही विकृत वाटत असू हरकत नाही. आम्ही जर गोष्टी काढायला गेलो तर देश सोडून निघून जातील. भारतीय जुगार पार्टी अर्थात गँबलिंग करणं हेच यांचं ध्येय आहे. नैतिकतेचे धडे दुसऱ्यांना शिकवत असतात. मात्र यांच्यासारखी भ्रष्ट पार्टी दुसरी नाही अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली.