Sanjay Raut : ‘भाजपवाल्यांची हिट विकेट, याला म्हणतात ‘आ बैल मुझे मार’; राऊतांनी पुन्हा डिवचलं
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. आज परत त्यांनी तोच फोटो ट्विट करत भाजपवर खोचक टीका केली आहे. मी माझ्या ट्विटमध्ये कुणाचं नाव घेतलं होतं का. किंवा कुणावर आरोप केले होते का. नाही. मी फक्त इतकंच म्हटलं होतं की महाराष्ट्र जळत असताना काहीजण मकाऊमध्ये व्यस्त आहेत. प्रदेशाध्यक्षांचं नाव जाहीर करून भाजपवालेच हीट विकेट झालेत.आ बैल मुझे मार असं म्हणतात याला हिंदी भाषेत अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
Ashish Shelar : ‘राऊतांकडे 27 तर आमच्याकडे 270 फोटो’; भाजप नेत्याचा इशारा काय?
नेमकं प्रकरण काय?
19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल एका ट्विटर पोस्टमध्ये म्हटले होते.
Did I name or made allegations against anyone in my tweet ? NO !
All I said in my simple Tweet was that 'some Nero is busy gambling in Macau (China) as Maharashtra burns…'
But the BJP threw a hit wicket and went on to announunce that the person in picture is 'their' State… pic.twitter.com/Ni6oaqt2Tf
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2023
राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो टाकले – फडणवीस
संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं. संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसेच भाजप आमदार आशिष शेलार यांनीही या मुद्द्यावर संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले होते.
Sanjay Raut : अजितदादा अन् शरद पवार सामन्यात विनर कोण? राऊत म्हणाले, निवडणुकीत..