Download App

‘मी जाळपोळ, बंदुक अन् गुंडांना घेऊन फिरत नाही’; भुजबळांची जरांगेंवर जळजळीत टीका

Chagan Bhujbal On Manaoj Jarange : मी जाळपोळ, बंदुक आणि गुंडांना घेऊन फिरत नसल्याचं म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर(Manoj Jarange Patil) जळजळीत टीका केलीयं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भुजबळ-जरांगे वाद चांगलाच पेटला आहे. जाहीर सभांमधून जरांगेंकडून भुजबळांना टार्गेट केलं जातंय तर भुजबळही मागे हटताना दिसत नाहीत. आता भुजबळांनी पुन्हा बीडच्या जाळपोळच्या घटनेवरुन जरांगेंवर टीका केली आहे.

Rohit Pawar : ..तर संपूर्ण पक्षच भाजपबरोबर गेला असता; अजितदादांचा दावा रोहित पवारांनी खोडला

छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे रोज बोलत असतात, मी 15 दिवसातून एकदा बोलतो. मी जाळपोळ करत नाही बंदूक आणि गुंडांना घेऊन फिरत नाही. लोकशाही मार्गाने मला जे अधिकारी मिळाले आहेत त्यानुसार मी माझी भूमिका मांडत आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे देखील ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिले पाहिजे असं माझं मत असल्याची भूमिका भुजबळांनी मांडली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि प्लेईंग 11

ओबीसीमध्ये आता बॅक डोअर एन्ट्री होत आहे. त्याला मात्र, आमचा विरोध आहे. बॅक डोअरने जी एन्ट्री मिळत आहे ती आम्ही कोर्टात रद्द करू. आमची भूमिका काय असेल हे ओबीसी नेते ठरवतील. तू काय महाराष्ट्राचा नेता नाही झालास सगळ्यांना ऑर्डर करायला, असा एकेरी उल्लेख करीत भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावलं आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहेच. फक्त कुणबी प्रमाणपत्र घेऊन जे बॅक डोर एन्ट्री करत आहेत त्याला आमचा विरोध असल्याचंही भुजबळांनी ठणकावून सांगितलं आहे.

Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक! पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन…

यावेळी बोलताना भुजबळांनी राज्यातील इतर विषयांवरही भाष्य केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात कोणी फ्लेक्स लावले हे मला माहित नाही. अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक बाबत भूमिका मांडली आहे. चंद्रशेखऱ बावनकुळेंना वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, आम्हाला वाटत अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे. एकनाथ शिंदे तर आता मुख्यमंत्री आहेतच त्यांच्या लोकांना अस वाटतंय शिंदे कायम राहिले पाहिजे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असे वक्तव्य करण्यात येत असल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us