Download App

फडणवीस चाणक्य हुशार वाटायचे पण फोडाफोडीतच हुशार; मनोज जरांगेंची जहरी टीका

देवेंद्र फडणवीस चाणक्य, हुशार वाटायचे पण फोडाफोडीतच हुशार असल्याची जहरी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलीयं. ते जालन्यात बोलत होते.

Manoj Jarange On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चाणक्य हुशार वाटायचे पण ते फोडाफोडीतच हुशार असल्याची जहरी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलीयं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांच्याकडून सत्ताधारी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे आंदोलनाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधलायं.

परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळण्याची राहुल गांधींना हौस, विखेंचा हल्लाबोल

मनोज जरांगे म्हणाले, सरकारने लक्ष द्यावं म्हणून मी आंदोलन करीत नाही, मी माझ्या समाजासाठी आंदोलन करीत आहे. बाकीच्या लोकांना त्यांचा राजकीय पक्ष वाचवायचा आहे. काही आमदार मंत्र्यांना त्यांची संपत्ती, मुलं वाचवायची आहेत. आमदार खासदारांसह त्यांच्या मुलांना तुरुंगात जाण्यापासून वाचवायचं असल्याने ते मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलत असल्याचा टोला मनोज जरांगे यांनी लगावलायं.

वर्षा बंगल्यावर CM शिंंदे अन् अजितदादांची खलबतं; जागावाटपासह ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

तसेच आम्हाला मराठा समाजाची लेकंर वाचवायचे आहेत, कोण येणार कोण नाही येणार यांचा विचार आम्ही करीत नाही, थांबा थोडे दिवस सर्वांना बरबाद करतो, तुम्ही मराठ्यांना विरोध करता का? बाकीचे लोकं पाहा इथं आमचेच आमच्याविरोधात बोलत आहेत, यांना पक्ष महत्वाचा वाटतोयं पण आरक्षण नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत. मी समाजासाठी डायरेक्ट आंदोलनाला बसत असतो, कोणतीही अपेक्षा ठेऊन मी आंदोलन करीत नाही, मल माझा समाज मोठा करायचा आहे, मी माझं कर्तव्य पार पाडत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Malaika Arora: अभिनेत्रीच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय?

फडणवीसाहेब आरक्षण द्या अन्यथा निकालात पडलेल्या उमेदवारांचीच नावं :
निवडणुकीत विरोधकांना मराठा समाजाचा फायदा झाला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. आम्ही कोणालाही पाडा म्हणालो नाही, आमच्या मतांमुळे कोणाला फायदा झाला हे आम्हाला माहित नाही. तुम्ही आरक्षण नाही दिलं तर तेच होणार ना..तुम्ही आरक्षण द्या ना मग, पण तुम्हाला आरक्षण द्यायंच नाही, रडका डाव खेळायचायं, तुमच्यासारखं रडकं सरकार मी पाहिलं नाही, मला वाटलं लय चाणक्य हुशार आहे पण ते फक्त फोडाफोडीत हुशार असल्याची जहरी टीका मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केलीयं.

follow us