Download App

आंबेडकरांबद्दल मला आदर पण..,; आवाहनानंतर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : प्रकाश आंबेडकरांबद्दल (Prakash Ambedkar) मला आदर आहे पण मी कुठलीही राजकीय भूमिका घेणार नसल्याचं प्रत्युत्तर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आंबेडकरांना दिलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगेंनी आपली भूमिका मांडली आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटियाने चित्रपटसृष्टीत केली 19 वर्षे पूर्ण; कसा होता संपूर्ण प्रवास जाणून घ्या

जरांगे म्हणाले, राज्यात मराठा बांधवांनी गाव बंदी केली नाही. पोस्टर लावायला आमच्या घरावर, गाडीवर लावण्याचा आम्हाला अधिकार आहे. मराठा समाजावर साखळी उपोषण केले तरी गुन्हे दाखल होतात. त्यानंतरच राज्यात चौताळून मराठा समाजाला दडपणाखाली आणत आहे. लोकशाहीची ताकद आम्ही वापरत आहोत त्यातूनच आम्ही एकत्र येणार आहोत. येत्या निवडणुकीत राजकीय सुपडा साफ करायला मराठा समाजाला वेळ लागणार नसल्याचा इशाराही राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिला आहे.

बैठक बोलावली पण पदाधिकाऱ्यांची दांडी, राज ठाकरे पुण्यातून बैठक न घेताच माघारी परतले

काय म्हणाले होते आंबेडकर?
जरांगे पाटील हि्ंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा तुम्हाला संपवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. तसेच आत्ता आंदोलन जर जिरवायचा नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही आणि इलेक्शनमध्ये उभे राहायचं नसेल तर इथले निजामी मराठे तुम्हाला कसं संपवतात हे तुम्हाला देखील कळणार नाही.

नवीन मित्र शोधावा लागेल इथला नवीन मित्र मुसलमानाशिवाय दुसरा कोणी नाही हे लक्षात घ्या. मुस्लिम समाजाला सांगतो राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षा देणार नाही, तुम्ही या वंचिताच्या चळवळीत सहभागी झालात तिथेच तुम्हाला सुरेक्षा मिळेल. जरांगे पाटील हिंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा संपवेल. हा निजामी मराठा काँग्रेसमध्ये आहे आणि भाजपकडे देखील आहे. ओबीसीचा मिळालेलं ताट जर अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला राजकीय समझोता करावा लागेल, असं आंबेडकर म्हणाले होते.

follow us