‘पैशाचं अन् माझं जमत नाही, म्हणूनच मी..,’; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं

Manoj Jarange Patil : पैशांचं, पदाचं आणि माझं जमत नाही, म्हणूनच मी मॅनेज होत नसतोयं, असं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, लातूरमधील औसामध्ये आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. Jayant […]

Maratha Reservation च्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं; जरांगे पाटलांची खुलेआम धमकी!

manoj jarange

Manoj Jarange Patil : पैशांचं, पदाचं आणि माझं जमत नाही, म्हणूनच मी मॅनेज होत नसतोयं, असं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, लातूरमधील औसामध्ये आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे.

Jayant Patil : राष्ट्रवादी फोडण्याचा एका पक्षाचा ‘बीआरएस’ला आदेश; जयंत पाटलांचा निशाण्यावर भाजप ?

मनोज जरांगे म्हणाले, काही मराठ्यांचे लोकं तर मला फोनच करायला लागले. ते लय बेकार आहेत ते आले तर मोकळं माघारी जात नाहीत. मी म्हणलं माझ्या टप्प्यात तर येऊ देत त्याला कसं वाजवतो बघ,त्यामुळे माझ्या नादालाचं कोणी लागत नाहीत. मी काही चूक केली नाही माझ्या गोरगरीब लोकांच्या मनातल्या गोष्टी मी बोलतो
गोरगरीबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आंदोलन तुमचं ऐकण्यासाठी नाही, मी मॅनेज होत नसतो कारण पद पैशाचं अ्न् माझं जमत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Horoscope Today: ‘कन्या’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

तसेच माझ्याकडे एकदा इंग्लिश बोलणारे माणसंच पाठवत होते, मी त्याला म्हणलं तुझं अन् माझं नाही जमू शकत. मी दिलं त्याला पाठवून. मराठीत मराठा आरक्षणावर प्रश्न विचारा उत्तर नाही दिली तर मराठ्यांची अवलाद सांगणार नाही. आमच्यावर अनेक षडयंत्र टाकले, उपोषणादरम्यान, डॉक्टर तपासायला आला अन् म्हणला मला एक किडनीच नाही मी टेंशनमध्ये आलो होतो, असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.

सोनिया गांधींचे 77 व्या वर्षात पदार्पण : PM मोदींनी दिल्या आरोग्यपूर्ण अन् दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा

मराठा आंदोलनात महिला पहिल्यापासून सहभागी आहेत. ज्या ज्या वेळी महिलांनी एखादा विषय मनावर घेतला, त्या त्यावेळी क्रांती झाली. आपल्या लेकरा-बाळांना आरक्षण मिळावं म्हणून अनेक मराठा बांधव, महिला, तरूण अंतरवलीतील आंदोलनात सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं.

मात्र, आंदोलकांवर प्राणघातक हल्ला झाला. माता-बहिणींच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता. याशिवया, आमची काय चूक होती? हे निर्दयी सरकार आहे, अशी टीका जरांगेली केली. आता माघार नाही, माझा जीव गेला तरीही मागं हटणार नाही अस जरांगे पाटील म्हणाले.

Exit mobile version