Prakasha Ambedkar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार, नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल. आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakasha Ambedkar) यांनी म्हटले आहे.
सरकारचा आणि जरांगे पाटील यांच्यातला आरक्षणावरून जे भांडण सुरू आहे ते असंच चाललं पाहिजे. कारण जरांगे पाटील यांच्या सरकारसोबतच्या लढ्यामुळे लोकांमध्ये जागृती होते. या देशातील सर्वात मोठं आरक्षण म्हणजे इथली बाजारपेठ होती. भारताची बाजारपेठ ही या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी राखीव होती. मात्र ती आता जगभरातल्या शेतकऱ्यांसाठी खुली झाली आहे. त्यामुळे व्यापारी जो भाव ठरवतो तोच मिळतो, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
नागपूरच्या अधिवेशनात फक्त पाट्या टाकायचे कामकाज, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
जरांगे आणि भुजबळ वादावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की मनमोहन सिंग यांच्या काळात एक मोठा तमाशा सुरु होता. एका बाजून पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूने मनमोहन सिंग. त्याची ही पुनरावृत्ती आहे. यापलीकडे काही नाही.
‘अश्वजीत’चा भाजपशी कोणताही संबंध नाही; आरोपांवर चित्रा वाघ यांनी सुनावलं
जरांगे पाटील यांना सरसकट आणि टिकाऊ मराठा आरक्षण देऊ असं सांगणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांनी एका प्रश्नच उत्तर द्यावं की महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल कुंभकुन यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात यशस्वी किल्ला लढवला. त्या कुंभकुल यांना त्या केसमध्ये नियमित का केलं नाही? लक्ष देऊ नका हजर राहू नका असं त्यांना का सांगण्यात आलं? याचे उत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी द्यावे, असा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.