Download App

‘शरद पवारांमध्ये आशावाद हा नैसर्गिक गुण’; निलंबनाच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

Chandrakant Patil On Sharad Pawar : आशावाद हा माणसाला दिलेला नैसर्गिक गुण तो शरद पवारांमध्ये सुद्धा असल्याची खरमरीत टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, संसदेच्या सुरक्षेप्रश्नी आवाज उठवणाऱ्या खासदारांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्रावर टीका केली. या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते.

‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण; सोशल मीडियावर अधिकृत माहिती

चंद्रकांत पाटील म्हणाले, आशावाद हा माणसाला दिलेला नैसर्गिक गुण आहे. कुठल्याही गोष्टीची आशा बाळगावी लागते, असं होईल तसं होईल बघत राहा, असं म्हणावं लागतं. तो माणसाला दिलेला नैसर्गिक गुण असून शरद पवारांमध्ये सुद्धा असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

संसदेत काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी घुसखोरांनी स्मोक कॅंडलद्वारे संसदेत धूर सोडला होता. त्यानंतर काही काळ संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन चांगलाच गदारोळ घातला होता. यावेळी संसदेत खासदारांनी सत्ताधारी विरोधात घोषणाबाजीही केली होती.

भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार; नौदलात 26 राफेल लढाऊ विमानांची भर

विरोधक खासदारांच्या या गदारोळामुळे लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी उर्वरित सत्रासाठी खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यावेळी सुरुवातील 46 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर आणखीन खासदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. निलंबित खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. त्यावरुन शरद पवारांनीही संसदेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याची टीका केंद्राच्या कार्यपद्धतीवरुन केली होती.

मोठी बातमी! वडगाव गुप्ता येथील शासकीय जमीन MIDCकडे वर्ग करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

शरद पवार काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी संसदेत काही लोकं घुसले होते. ते चार लोकं संसदेत आले कसे? त्यांना पास कसा मिळाला? यावर चर्चा व्हायला हवी. चर्चा करण्याचा संसदेचा पूर्ण अधिकार आहे. पण असं न करता या मुद्द्यावर विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर 150 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. देशातली जनता हे सगळं पाहत असून त्याची किंमत जनता वसूल करणार, असा मला विश्वास असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच 150 खासदारांना संसदेतून बाहेर काढलं ही चांगली गोष्ट नाही. संसदेच्या इतिहासात असं कधी झालं नाही ते सध्या संसदेत सुरु असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Tags

follow us