भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार; नौदलात 26 राफेल लढाऊ विमानांची भर

भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार; नौदलात 26 राफेल लढाऊ विमानांची भर

Rafale Fighter Jets : भारताची समुद्री ताकद आता आणखीन वाढणार आहे कारण भारतीय नौदलाच्या (India Navy) ताफ्यात आणखीन 26 राफेल लढाऊ विमानांची (Rafale Fighter Jets) भर पडणार आहे. भारतीय नौदलाच्या आएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकांसाठी फ्रान्सने 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी निविदा भरल्या आहेत. यासंदर्भात भारताने फ्रान्सशी चर्चा केली होती.

BHR गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजलं; महिनाभरात कारवाई करण्याचा फडणवीसांचा शब्द

आता फ्रान्सने या करारावर आपली प्रतिक्रिया दिली असून हा करार दोन्ही देशांमधील आंतर-सरकारी फ्रेमवर्क अंतर्गत के जाणार आहे. यासंदर्भातील सुत्रांच्या हवाल्याकडून देण्यात आली असून परदेशात लष्करी विक्रीसंदर्भातील फ्रेंच सरकारी अधिकाऱ्यांचं पथक पॅरिसहून दिल्लीत निविदेबाबत येणार आहे.

गिल-बिश्नोईची बादशाहत संपली, ‘हे’ खेळाडू बनले आयसीसी क्रमवारीत नंबर वन

आता भारत फ्रेंच बोलीचा आढावा घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले असून फ्रेंच बोलीमध्ये विमानाची व्यावसायिक ऑफर किंवा किंमत तसेच कराराच्या इतर तपशीलांचा समावेश असणार आहे. संरक्षण मंत्रालयाने जुलैमध्ये राफेलची नौदल पॅटर्न खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार, ‘या’ 2 खेळाडूंना खेलरत्न

महिनाभरापूर्वीच भारताने फ्रान्स सरकारला डसॉल्ट एव्हिएशनकडून विमान खरेदी करण्याबाबत माहिती देणारे निवेदन पाठवले होते. या करारासंदर्भात ऑक्टोबरच्या सुरुवातीला Dassault चे अध्यक्ष आणि CEO एरिक ट्रॅपियर यांनी भारताच्या या संभाव्य खरेदीवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला भेट दिली होती.

‘दानवेंचे आरोप अन् लोढांचा अधिवेशनातच राजीनामा’; विधानपरिषदेत हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पॅरिस दौऱ्यात या कराराचा निर्णय घेण्यात आला. भारत-फ्रान्स करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी व्हावी, यासाठी भारतीय नौदल आणि भारत सरकार जलद गतीने काम करत आहेत. Tata Boeing Aerospace Limited ने हैदराबाद येथील अत्याधुनिक सुविधेत निर्मित AH-64 Apache अटॅक हेलिकॉप्टरसाठी 250 व्या फ्युजलेजचा पुरवठा केला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube