मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा डाव उधळला; भारतीय नौदलाची जिगरबाज कामगिरी
Malta Flagged Vessel MV Ruen : अज्ञात लोकांनी माल्टा देशाचा ध्वज असलेले एका मालवाहू जहाजावर कब्जा केला होता. मात्र या प्रकाराची माहिती होताच भारतीय नौसेनेने कारवाई करत हा प्रकार हाणून पाडला. भारतीय नौसेनेने सांगितले की अरबी समुद्रात एका मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. सहा अज्ञात लोकांनी एका मालवाहक जहाजाचा ताबा घेतला होता. या प्रकारची माहिती कळताच तत्काळ कार्यवाही करण्यात आली. या जहाजाला समुद्रातील लुटेऱ्यांकडून मुक्त करण्यात आला. आता भारतीय नेवी (Indian Navy) या जहाजाची निगराणी करत आहे.
नौदलाने सांगितले की ज्यावेळी या जहाजाने मदत मागितली. त्यावेळी मदतीसाठी युद्धनौका पाठवण्यात आल्या. जलद प्रतिसाद म्हणून भारतीय नौदलाने या जहाजाचा शोध घेण्यासाठी गस्त घालणारी विमानेही रवाना केली होती. काल सकाळी गस्ती विमानांनी अपहरण करण्यात आलेल्या जहाजावर घिरट्या घालण्यास सुरुवात केली. या जहाजावर सतत नजर ठेवली. आता मिळालेल्या माहितीनुसार जहाज सोमालियाच्या किनाऱ्याकडे जात आहे.
Parliament Security : घुसखोरीआधी होता वेगळाच प्लॅन; दिल्ली पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती
समुद्री क्षेत्रात अशा घटना रोखण्यासाठी, व्यापारी जहाजांची सुरक्षा करण्यासाठी आणि सर्वात आधी मदत करण्यासाठी भारतीय नौदल नेहमीच सज्ज आहे असे नौदलातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले. स्पॅनिश नौदलाचे एक जहाजही या अपहरण झालेल्या जहाजाच्या मदतीसाठी पाठवण्यात आले होते.
स्पेनमधील एका केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गुरुवारी सोमालियाच्या सोकोत्रा बेटाच्या पूर्वेला 500 नॉटिकल मैल अंतरावर असताना माल्टाच्या जहाजाकडून इशारा मिळाला होता. हे मालवाहू जहाज सोमालियाच्या दिशेने जात असताना त्यावर समु्द्रातील दरोडेखोरांच्या टोळीने हल्ला केला होता. त्यामुळे जहाजावरील क्रूचे नियंत्रण सुटले होते. 2017 पासून आतापर्यंतचा विचार केला तर सोमाली समुद्री लुटेऱ्यांनी पकडलेले हे सर्वात मोठे जहाज होते. अनेक देशांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे एडनचे आखात आणि हिंद महासागरात अशा घटनांना आळा घालण्यात यश मिळाले आहे.
Russia : वृद्ध महिलेचा सवाल अन् पुतिन निरुत्तर, थेट माफीच मागितली; रशियात काय घडलं ?