Download App

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धनंजय मुंडे धावले; स्वतःच्या ताफ्यातील वाहन हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी दिले

धनंजय मुंडे हे हरसुल-सावंगी या या टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ते धाऊन गेले.

  • Written By: Last Updated:

छत्रपती संभाजीनगर : कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) हे आज छत्रपती संभाजीनगर येथील कामकाज आटोपून समृद्धी महामार्गाने (Samriddhi Highway) मुंबईकडे जात असताना संभाजीनगर शहरालगतच्या हरसुल-सावंगी या या टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ते धाऊन गेले.

Ratan Tata Health News : उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती गंभीर, ICU मध्ये दाखल 

धनंजय मुंडे हे समृद्धी महामार्गाकडे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले.
एक पुरूष व एक महिला मोटारसायकलवरून जात असतांना एका वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्या शरीरातून मोठा रक्तस्त्राव होत होता. हे दृश्य पाहताच धनंजय मुंडेंनी तातडीने आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. स्वतःचा स्टाफ आणि जवळ आज उभ्या असणाऱ्या माणसांच्या मदतीने या जखमींना आपल्या ताफ्यातील सुरक्षेचे पोलीस वाहन उपलब्ध करून दिले व गाडीत रुग्णांना घेऊन तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये जाण्याची सूचना केली.

औद्योगिक वसाहतीला विळखा घालून बसलेल्या कोल्हेंकडून रोजगार मेळाव्याचा देखावा रावसाहेब चौधरींचा गंभीर आरोप 

माझ्यासोबत सुरक्षेसाठी वाहन नसले तरी चालेल. मात्र आधी या जखमींना घेऊन हॉस्पिटलमध्ये जा, अशी सक्त ताकीदच त्यांनी वाहनचालकाला दिली. तसेच
रुग्णालय प्रशासनाला देखील अपघातग्रस्तांबाबत दक्षता घेण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी दिल्या. त्यांनी तातडीने घाटे रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांना फोन करून जखमींना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्यात.

या दांपत्याला धडक देऊन निघून गेलेल्या गाडीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत स्थानिक पोलिसांनाही धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, धनंजय मुंडे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असून अशा प्रसंगी तातडीने मदतीला जाण्याबाबत ते नेहमीच तत्पर असतात, त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली.

follow us