औद्योगिक वसाहतीला विळखा घालून बसलेल्या कोल्हेंकडून रोजगार मेळाव्याचा देखावा रावसाहेब चौधरींचा गंभीर आरोप
Raosaheb Chaudhary : औद्योगिक वसाहतीत रस्ते धड नाही, अरुंद रस्ते, पाणी, कचरा, सांडपाणी प्रश्न, वसाहतीत पायाभूत सोयी सुविधांचा मोठा अभाव असून उद्योजक वैतागले आहेत. समस्यांचा महापूर असल्यामुळे औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग यायला तयार नाही. जे उद्योग सुरु आहे त्यांनाही कोल्हेंच्या राजकीय दबावाखाली उद्योग-व्यवसाय करावा लागत असून अनेक भूखंड रिकामे पडले आहेत.
औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेपासून औद्योगिक वसाहतीवर विळखा घालून बसलेले कोल्हे औद्योगिक वसाहतीत एकही नवीन उद्योग आणू शकले नाही. त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी रोजगार मेळाव्याचा देखावा केला असल्याची टीका पद्मविभूषण शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) पतसंस्थेचे व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी (Raosaheb Chaudhary) यांनी केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कोल्हेंनी रोजगार मेळाव्याचा मोठा गाजा वाजा केला मात्र कोल्हेंना जर खरोखर बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचेच असते तर पिढ्यान पिढ्या ज्या औद्योगिक वसाहतीवर विळखा घालून बसले आहेत त्या औद्योगिक वसाहतीत नवीन कंपन्या आणून त्या ठिकाणी सहजपणे रोजगार देवू शकले असते. मात्र त्यांना त्या ठिकाणी एकही नवीन उद्योग आणता आला नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे चेअरमन म्हणून मिरविणारे विवेक कोल्हे कर्तृत्वात शून्य आहे.
निवडणुकीच्या तोंडावर रोजगार मेळावा घेवून लोकांना वेड्यात काढण्याची कोल्हेंची जुनीच सवय आहे. असाच नोकरी महोत्सव 2014 ला देखील घेतला आणि जनतेच्या भावनांशी खेळून आपला स्वार्थ त्यांनी साधला होता. मात्र त्या नोकरी महोत्सवाचा फुगा लवकरच फुटून बेरोजगारांचा भ्रमनिरास झाला होता. त्याचा बदला 2019 च्या निवडणुकीत नागरिकांनी घेवून त्यांना कायमचे घरी बसवत आपला रोष व्यक्त केला होता. याहीवेळी कोल्हेंनी पुन्हा एकदा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी 2014 प्रमाणे नोकरी महोत्सव घेतला असला तरी सर्व सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळण्याची कोल्हेंची हि जुनीच सवय असली तरी जे 2019 ला झाले तेच 2024 ला होवून आमदार आशुतोष काळेच पुन्हा मोठ्या मताधिक्याने आमदार होणार आहे.
गोदावरी कालवे दुरुस्ती होणार, 195.17 कोटीच्या निविदा प्रसिद्ध, आ. आशुतोष काळेंची माहिती
कोपरगाव मतदार संघात या पाच वर्षात झालेला विकास कोल्हे कुटुंबाकडे चाळीस वर्ष सत्ता असतांना देखील झालेला नाही. त्यामुळे टीका करून व खोटे आरोप करून चर्चेत राहण्यासाठी बालिश युवा नेते स्मार्ट सिटीबाबत जरी नेहमीप्रमाणे बिनबुडाचे आरोप करीत असले तरी स्मार्ट सिटीबाबत योग्य वेळी, योग्य ठिकाणी पुराव्यासह योग्य उत्तर देवून तुमचे दात तुमच्याच घशात घालू असा ईशारा व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी यांनी यांनी विवेक कोल्हे यांना दिला आहे.