राष्ट्रवादी उभी फुट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) अजित पवार(Ajit Pawar) गटावर टीकेची तोफ डागत आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अशातच आता एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse patil) यांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे वळसे पाटलांच्या टीकेची राजकारणात चर्चा सुरु आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात, असं दिलीप वळसे पाटलांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवलं आहे.
Aparshkti Khurana Video : ‘तेरे लिये प्यार बहुत है’ अपारशक्तीचं नवं रॅप सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या, असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Aparshkti Khurana Video : ‘तेरे लिये प्यार बहुत है’ अपारशक्तीचं नवं रॅप सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला
अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र, आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी उभी फुटी पडल्यानंतर पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या वाकयुद्धाचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
दरम्यान, आपल्यातील काही लोक विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं सांगतात. परंतु त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य न सल्याची टीका शरद पवार यांनी आज केली. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी टीका केलीयं. त्यांच्या या टीकेनंतर शरद पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.