Hasan Mushrif : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Elction) वेध लागले आहेत. सर्वच पक्षांनी विधासभेसाठी तयार सुरू केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) फारस यश न मिळाल्यानं राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला.
संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा! पोलिसांचं मौन; संभाजीराजेंनी क्लिअर सांगितलं
हसन मुश्रीफ यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. कारण लोकसभेचे मुद्दे वेगळे आणि विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात. लोकसभा निवडणुकीत जी लाट महाविकास आघाडीच्या बाजूने होती, ती लाट विधानसभेला महायुतीच्या बाजूने होईल. राज्यात महायुती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मुश्रीफांनी व्यक्त केला.
समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत…; हसन मुश्रीफांनी ठणकावले
पुढं बोलतांना ते म्हणाले, महायुतीने चारशे पारचा नारा दिल्याने आम्ही संविधान बदलणार अशी नॅरेटिव्ह विरोधकांनी रुजवलं. विधानसभेला संविधानाचा मुद्दा असणार नाही. मराठा आरक्षणावरूनही टीका व्हायची, तर आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं. सगेसोयरे अध्यादेशाबाबतही लवकरच निर्णय होईल. कांद्या आणि दुधाचे प्रश्न सोडवले. दुधाला अनुदान दिलं. बजेटमध्येही सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक योजना घोषित केल्या. महिलासांठी लाडकी बहिण योजना, कृषी पंपांना मोफत वीज यायोजनामुळे महायुतीविषयी राज्यात पुरक वातावरण तयार झाल्याचं, मुश्रीफ म्हणाले.
…तर सत्तेत अडचणी येतील
यावेळी बोतलाना त्यांनी भाजपला सुनावलं. मला ईडीच्या प्रकरणात अडकवण्यासाठी समरजित घाटगेंनीच प्रयत्न केले होते, भाजपने घाटगेंना दाणे घालता कामा नये, तरच महायुतीची सत्ता येईल. अपक्ष बंडखोरांना पाठिंबा दिला तर सत्तेत अडचणी येऊ शकतात, असा इशारा मुश्रीफांनी दिला.
अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. रोहित पवारांनी अनेकदा सूचक विधानही केलं. यावरही मुश्रीफांनी भाष्य केलं. आमचा एकही आमदार शरद पवारांकडे जाणार नसल्याचं मुश्रीफ म्हणाले.