Download App

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; मंत्री विखेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. ते काय बोलतात याचे भान त्यांना राहिलेले नाही. - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – आगामी विधानसभा निवडणुकीच्य (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकेच्या फैरी झडत आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. शाह हे अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज असल्याचा टोला ठाकरेंनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर असल्याची टीका त्यांनी केली.

Rajarani : ‘राजाराणी’तून पाहायला मिळणार गावरान अनोखी प्रेमकहाणी, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 

महसूल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ आणि दाखल्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर असल्याने मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्यात. महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बील माफ केले. मुलीसाठी उच्चशिक्षण मोफत केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात सहा लाख अर्ज दाखल झाले असून संगमनेर तालुक्तयात 88 हजार अर्ज दाखल झालेत. लाडक्या बहिणाना रक्षाबंधनााच्य दिवशी योजनेचा लाभ देण्यात येणार असून महायुतीच्या पाठीशी लाडक्या बहिणीचा आशिर्वाद निश्चित राहिल, असा विश्वास विखेंनी व्यक्त केला.

राजकीय निवृत्तीची घोषणा प्रकाश सोळंकेंची अन् चर्चा सुरू झाली शरद पवारांची; काय आहे कनेक्शन? 

सरकार केवळ घोषणाच करत नाही तर अंमलबजावणीही करत आहे. या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता महसूल पंधरवडा आयोजित केला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितलं.

पुढं बोलतांना त्यांना विरोधकांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. ते काय बोलतात याचे भान त्यांना राहिलेले नाही. शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यतार राहिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.

कॉंग्रेसमध्ये प्रत्येकजण मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याने त्यांचे स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपनेच ठरणार, असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
महायुती सरकार पारदर्शीपणे काम करत असून भ्रष्टाचाराला थारा नाही. राज्यात चार तलाठींनी नियुक्तीपत्र दिले. अहिल्यानंगरमधील 189 उमेदवार आहेत. पण, तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेवरून केवळ महसूल विभागाला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप विखेंनी केला. तालुक्यातील 34 हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून 84 हजार शेतकऱ्यांना 128 कोटी रुपयांचा विमा रक्कम मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

follow us