Download App

शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला, तुम्ही त्यांच्याच मांडीवर…; विखेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

दिवंगत शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्या सोबत संघर्ष केला, तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसता हे काही योग्य नाही- राधाकृष्ण विखे पाटील

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. मात्र, ऐन विधासनभेच्या तोंडावर महायुतीला (Mahayuti) एकामागून एक धक्के बसत आहेत. आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटी (Harshvardhan Patil) हेही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत घोषणा केली होती. यावर यावर आता भाजप नेते आणि मंत्री (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘…तर विधानसभा निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करेन’; अरविंद केजरीवालांचे पीएम मोदींना आव्हान 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग वाढलं आहे, हा महायुतीला धक्का आहे का? असा सवाल मंत्री विखे पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, महायुतीला धक्का वैगरे काही नाही. महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत, त्यांचा विचार तर महायुतीला करावाच लागले. हर्षवर्धन पाटील यांची तशीच अडचण झाली होती. त्यांनी तुतारी हाती घेण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. दिवंगत शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्या सोबत संघर्ष केला, तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसता हे काही योग्य नाही, असा टोला विखे पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला.

मोठी बातमी! महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेटने धुव्वा उडवला 

पाथर्डी आणि नगर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आलं, पण बिलं उधार ठेवून आलेत. आता सरकार उधारी देत नाहीये म्हणून तिथल्या कंपनीने महायुती सरकारला नोटीस पाठवली. महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळं आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, अशी टीका आमदार रोहित पवार केली. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला माहित नव्हतं की, रोहित पवार आता हॉटेलचे बिल देखील पाहत आहेत. मीच त्यांना ही सर्व बिलं पाठवून देतो, असं म्हणत विखेंनी रोहित पवारांना टोला लगावला.

follow us