Minister Radhakrushna Vikhe Patil : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांना भाजपात येण्यासाठी ऑफर आणि धमकी दिल्याचा दावा खुद्द अभिजित दीपके यांनी माध्यमांसमोर केला होता. या दाव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अभिजित दीपके यांना खुलं आव्हानच दिलंय. अभिजित दीपकेंना कोणी धमकी आणि ऑफर देत असेल तर त्यांनी दबावाला बळी न पडता नावं सांगावं, असं आव्हानच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी केलं आहे. ते अहिल्यानगमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अभिजित दीपके यांनी कोणत्याही दबावाला बळी पडून वक्तव्ये करु नयेत. धमकी आणि ऑफर देणाऱ्यांची माहिती त्यांनी समोर येऊन द्यावी. भाजपला बदनाम करण्यासाठी अशी वक्तव्ये करु नये. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात कधीच नव्हते. आंदोलनाबाबत सकारात्मक चर्चा केली. विद्यार्थ्यांनीही आंदोलन मागे घेतले आहे. आता जनाधार गमावलेल्या काही राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेऊन राजकारण सुरु केले असल्याची सडकून टीकाही राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.
196 देश अन् फिजी; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड राहुल कोळोखे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?
तसेच अभिजित दिपके यांनी संदिग्धता निर्माण करण्यापेक्षा माध्यमांसमोर येऊन कोणी धमकी आणि ऑफर दिली हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. केवळ भारतीय जनता पक्ष आणि नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी अशी वक्तव्ये करणे उचित नाही. त्यांच्या माध्यमातून कोणी असा प्रयत्न करीत असेल तर अभिजित दिपके यांनीही त्याला बळी पडू नये, असाही सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला आहे.
जंतर मंतर मैदानावरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय प्रवेश परीक्षांबरोबरच इतरही परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी धाडसी निर्णय घेतला आहे. परीक्षा सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्हीही सभागृहांनी मंजूर केले, याचे संपूर्ण देशात स्वागत झाले आहे. देशातील परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारने तांत्रिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याचाही निर्णय करून, विद्यार्थ्यांना नवा विश्वास दिला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मोठी बातमी : महिलांसाठी आरक्षित असलेले सरपंचपद पुढील कार्यकाळात सर्वसाधारण; न्यायालयाचा सरकारला झटका
दरम्यान, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत गदारोळ केला. यावेळी त्यांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरही मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी भाष्य केलं असून ते म्हणाले, लोकसभेचे सभागृह बेताल वक्तव्य करण्यासाठी नाही, लोकसभेची गरिमा राखली गेली पाहिजे, त्यामुळेच खासदार अनुरागसिंह ठाकूर यांनी गांधींच्या विरोधात असंवैधानिक शब्द वापरल्याच्या कारणाने दाखल केलेल्या ठरावाचे समर्थन केले असल्याचंही विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
