अहमदनगर : कॉंग्रेस पक्षात सत्यजित तांबेंवर खरच अन्याय झाला असेल तर तो त्यांनी जाहीरपणे मांडण्याचा सल्ला मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
त्याचबरोबर नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेऊन जो आदेश देतील. त्या उमेदवाराचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील. असं देखील यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. पोपटपंची करणाऱ्या भविष्यकारांकडून जेवढ्या तारखा सांगितल्या जातील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. सरकारच्या संदर्भात त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांची किव येते. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला असलातरी त्यांची पोपटपंची वायफळ आणि तथ्यहीन असल्याची टिका करून ते जेवढ्या तारखा जाहीर करतील तेवढा शिंदे फडणवीस सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.